Saturday, July 27, 2024

महाराष्ट्र दिनी ‘संयुक्त महाराष्ट्र’ चित्रपटाची केली घोषणा

स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारण्यात आला. ही चळवळ भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्राच्या आतापर्यंत झालेल्या सर्व चळवळीतील एक प्रमुख चळवळ होती. आजवर झालेल्या अनेक चळवळी या इंग्रजांविरोधातील होत्या. मात्र ही चळवळ वेगळी होती. यामुळे देशाचे राजकारण कोलमडले आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. आज याच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत कल्याणी पिक्चर्स आणि अभिता फिल्म्स प्रस्तुत ‘संयुक्त महाराष्ट्र’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘पॅावर वर्सेस प्राईड’ अशी टॅगलाईन आहे .तर सुनील शेळके ‘संयुक्त महाराष्ट्रा’चे निर्माते आहेत. २०२५ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात कोण कलाकार झळकणार हे येत्या काळात कळलेच.

चित्रपटाबद्दल निर्माते सुनील शेळके म्हणतात, ‘’ ही चळवळ आजवरची संयुक्त महाराष्ट्राची सर्वात मोठी चळवळ होती. राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक अशा सगळ्याच बाजुने ही चळवळ होती. चित्रपटात हेच दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

पहिलाच चित्रपट ठरला हिट, तर पुढे तिन्ही खानसोबत काम करायची मिळवली तिने सुवर्णसंधी; वाचा अनुष्का शर्माचा यशस्वी जीवनप्रवास
अनुष्का शर्माने ‘या’ चित्रपटात दिला जबरदस्त किसिंग सीन, इंटिमेट सीन्स देऊन घातला धुमाकूळ

 

हे देखील वाचा