Tuesday, May 28, 2024

अनुष्का शर्माने ‘या’ चित्रपटात दिला जबरदस्त किसिंग सीन, इंटिमेट सीन्स देऊन घातला धुमाकूळ

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही तिच्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखली जाते. अनुष्का सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचा पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबतचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. त्याचबरोबर अनुष्का तिच्या चित्रपटांतील अभिनयामुळे देखील चर्चेत राहिली आहे. अनुष्काने अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळे सीन दिले आहेत. ज्यात किसिंग सीनचा देखील समावेश आहे. चला तर मग अनुष्काने कोणत्या चित्रपटामध्ये किसिंग सीन देऊन धुमाकूळ घातला ते जाणून घेऊया.

अनुष्काने (anushka sharma) बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगसोबत (ranveer singh) ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटात काम केले होते. ज्यामध्ये दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती. या चित्रपटात अनुष्काने रणवीर सिंगसोबत लिपलॉक किसिंग सीन दिला होता. ज्यामुळे ती चर्चेत आली होती. या सीनचे व्हिडिओ आणि फोटो अजूनही व्हायरल होत आहेत.

Anushka Sharma - IMDb

‘बँड बाजा बारात’ चित्रपटातून रणवीरने केले पदार्पण

‘बँड बाजा बारात’ हा अनुष्काचा दुसरा चित्रपट होता. तर रणवीरने या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

‘बँड बाजा बारात’ चित्रपट १२ वर्षांपूर्वी झाला होता प्रदर्शित

‘बँड बाजा बारात’ हा चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्याचे दिग्दर्शन मनीश शर्मा यांनी केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता.

Anushka Sharma opened up about getting rejected at the age of 15 based on her looks, called it "mentally damaging"

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अनुष्काचा शेवटचा चित्रपट ‘जीरो’ होता. हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. शाहरुख खानसोबत या चित्रपटात काम केल्यानंतर अनुष्का दुसऱ्या कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसलेली नाही. ‘जीरो’नंतर अनुष्काचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. निर्माती म्हणून तिने काही प्रशंसनीय चित्रपट आणि वेबसिरीज केल्या. यामध्ये ‘पाताल लोक’ आणि ‘बुलबुल’ यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय ती ‘किला’चे दिग्दर्शनही करत आहे. ज्यामध्ये इरफान खानचा मुलगा बाबिल दिसणार आहे.

हेही वाचा :

सलमान खानच्या ‘दगाबाज’ गाण्यावर थिरकला त्याचा बॉडीगार्ड शेरा, व्हिडिओ शेअर करत म्हणाला…

‘भूतकाळ जर मानगुटीवर बसत असेल तर…’, अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसेंच्या भूमिकेबाबत नाना पाटेकर झाले व्यक्त

इलियाना डिक्रूझ झाली ‘Oops Moment’ची शिकार, पारदर्शक ड्रेसमध्ये दिसलं ‘ते’

 

हे देखील वाचा