सपना चौधरीच्या फोटोंची आहे सर्वत्र चर्चा, ‘या’ कारणामुळे फोटोंवर पडतोय कमेंट्सचा पाऊस


हरियाणवी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सपना चौधरी. तिने तिच्या अभिनयाने सर्वांच्या मनात घर बनवलेच आहे. पण सोशल मीडियावर देखील तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना प्रेमात पडण्याची एकही संधी ती सोडत नाही. नुकतेच सपनाने काही देशी लूक मधील तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

सपना चौधरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट वरून तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने फुलांची प्रिंटेड गुलाबी रंगाची साडी आणि काळया रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे. या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. सोबतच कानात घातलेले कानातले आणि गळ्यातील मंगलसूत्राने तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. या साडीमध्ये तिने वेगवेगळ्या पोझ देत फोटो काढले आहेत. सध्या तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा चालू आहे. सपनाने तिचे हे फोटो शेअर करून लिहिले आहे की, “आजची सर्वात चांगली गोष्ट तुमच्याकडे कालपेक्षा आज जास्त पर्याय आहेत.”

देशावर आलेल्या कोरोना महामारीत देखील सपना चौधरीने समाजाप्रती तिचे दायित्व दाखवले होते. या बाबत तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. जो मोठ्या संख्येने व्हायरल होत होता.

हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले होते की,” या महामारीमध्ये आपल्याला सर्वांना एकत्र मिळून पुढे जायचे आहे. नागरिकांना या बाबत जागरूक करायचे आहेत. जेणेकरून ते स्वतःहून प्लाझ्मा दान करतील. ही वेळ पुढे येऊन मानवतेच्या नात्याला आणखी भक्कम करण्याची आहे.”


Leave A Reply

Your email address will not be published.