Wednesday, February 19, 2025
Home बॉलीवूड हरयाणवी डान्स क्वीन सपना चौधरीचा नवीन ‘चटक मटक’ डान्स व्हायरल, व्हिडिओत सपनाचा जबराट डान्स

हरयाणवी डान्स क्वीन सपना चौधरीचा नवीन ‘चटक मटक’ डान्स व्हायरल, व्हिडिओत सपनाचा जबराट डान्स

हरयाणवी डान्स क्वीन सपना चौधरी तिच्या डान्सने सगळ्यांचं वेड लावत असते. तिच्या डान्सचे दिवाने हे फक्त हरियाणा नाहीतर संपूर्ण भारतात आपल्याला सापडतील. सपनाच्या स्टेज शोला देखील कानाकोपऱ्यातून लोकं येतात. शिवाय दररोज तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वायरल होत असतात. सोबतच सपना नेहमी तिच्या डान्सचे नवीन व्हिडिओ तिच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करत असते.

सपनाच्या काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘लोरी’ या गाण्याला अजूनही लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळत असताना, सपनाचे नवीन गाणे सोशल मीडियावर वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सपना ‘चटक मटक’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

एनिटाइम्स रिकॉर्ड्स या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झालेल्या या गाण्याला दमदार प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या गाण्याला २० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. देसी डान्स क्वीन म्हणून प्रसिद्ध असणारी सपना चौधरी या हरयाणवी गाण्यावर जोरदार ठुमके लावताना दिसत आहे. निळ्या रंगाच्या सलवार सूट मध्ये सपना अतिशय सुंदर दिसत आहे.

सपनाला एवढी लोकप्रिय बिग बॉसमध्ये सहभाग घेतल्यानंतर मिळायला लागली. बिग बॉसने सपनाला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. सपना फक्त हरयाणवीच नाही तर भोजपुरी, पंजाबी आणि बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काम करते. तिने बॉलीवूडमध्ये ‘दोस्ती के साइड इफेक्ट्स’ सिनेमातून एन्ट्री घेतली. सपना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे डान्स व्हिडिओ पोस्ट करत असते.

हे देखील वाचा