‘गजबन’ गाण्यावरील सपना चौधरीचा डान्स पाहून लोकांनी मारल्या शिट्या, डान्सिंग क्वीनने स्टेजवर लावली आग

हरियाणाचे डान्सिंग क्वीन सपना चौधरी तिच्या गाण्यांसाठी आणि तिच्या डान्ससाठीच ओळखली जाते. सपनाचे संपूर्ण जगभरात लाखो फॅन्स आहेत. तिचे फॅन्स नेहमीच तिच्या गाण्यांची आतुरतेने वाट बघत असतात. तिचे गाणे प्रदर्शित झाल्या झाल्या व्हायरल होतात. पूर्वी फक्त हरियाणा आणि आजूबाजूच्या परिसरात प्रसिद्ध असलेली सपना आता संपूर्ण देशात परदेशात लोकप्रिय आहे. तिला सोशल मीडियावर तुफान फॅन फॉलोविंग तिचे नवे नाही तर जुने विडिओ देखील इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसतात. सध्या नुकताच सपना चौधरीचा एक व्हिडिओ तिच्या फॅन पेजवर शेअर केला गेला असून, त्यावर तिच्या चाहत्यांच्या भरपूर कमेंट्स येत आहेत.

सपना चौधरी जेव्हा जेव्हा स्टेजवर येते तेव्हा तिला बघण्यासाठी तुफान गर्दी होते. तिचा डान्स आणि झलक बघण्यासाठी लोकं आणि फॅन्स आसुसलेले असतात. सध्या तिच्या फॅन पेजवरचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्या व्हिडिओमध्ये सपना साडी नेसून तिच्या लोकप्रिय गाण्यावर ‘गजबन’वर डान्स करताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sapna Choudhary (@sapnachoudharyfann)

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये सपना चौधरी शिमरी साडी आणि स्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये नाचताना दिसत आहे. तील डान्स करताना पाहून तिच्या आजूबाजूला भरपूर गर्दी जमा झाली असून, सर्वच लोकं तिला मोबाईलमध्ये कैद करताना दिसत आहे. याशिवाय तिच्या आजूबाजूला भरपूर फोटोग्राफर असून ते तिला कॅमेऱ्यामध्ये कैद करताना दिसत आहे. या व्हिडिओवर कमेंट्स करताना नेटकऱ्यांनी लिहिले, “तुझ्यासारखे दुसरे कोणीच नाही.”, एकाने लिहिले, “सुपर से उपर.”

काही दिवसांपूर्वीच सपनाचे ‘खुडका’ गाणे प्रदर्शित झाले असून, त्याला लोकांचा अमाप प्रतिसाद मिळत आहे. सध्या सपनाचे एका मागोमाग एक सतत गाणे प्रदर्शित होत असून, सर्वच हिट होताना दिसत आहे. वैयक्तिक आयुष्यामध्ये व्यस्त असूनही सपना तिच्या व्यावसायिक आयुष्यात कार्यरत दिसत आहे. ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असून, सतत तिचे फोटो पोस्ट करताना दिसते.

Latest Post