×

‘गोरी नाचे’ गाण्यावर देशी लूकमध्ये सपना चौधरीने केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल

लोकप्रिय हरियाणवी गायिका आणि डान्सर सपना चौधरी नेहमीच तिच्या फॅन्ससाठी सोशल मीडियावर काहींना काही पोस्ट करत फॅन्सच्या संपर्कात असते. सपनाचे फॅन्स देखील तिच्या पोस्टची आणि व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असतात. ती नेहमीच तिच्या घायाळ करणाऱ्या डान्सने आणि लक्षवेधी अदांनी लोकांचे लक्ष वेधून घेत असते. नुकताच सपनाने तिचा एक डान्स व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. जो पाहून फॅन्स आणि नेटकरी तिचे कौतुक करताना थकत नाही. या वेळेस सपनाने तिचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात ती ‘गोरी नाचे’ या राजस्थानी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

सपनाने शेअर केलेल्या या इंस्टाग्राम रील व्हिडिओमध्ये तिचा अंदाज आणि डान्स चांगलाच भाव खाऊन जात आहे. गोरी नाचे या गाण्यावर डान्स करणारी सपनाने व्हिडिओमध्ये गुलाबी रंगाची मोजडी आणि सुंदरसा मल्टिकलरचा पटियाला सूट घातला असून, त्यावर डोक्यावर दुपट्टा घेतला आहे. जसे गाणे वाजायला लागते तशी सपना तिच्या जबरदस्त अशा ठुमक्यांनी आणि मनमोहक हास्याने सर्वांना घायाळ करते. हा डान्स करताना ती मस्ती देखील करत होती. तिचा हा मस्तीमय डान्स तिच्या फॅन्सला आवडत असून हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंट्स करत नेटकरी सपनाचे कौतुक करत आहे. आता पर्यंत या व्हिडिओला १ लाखापेक्षा अधिक व्ह्यूज आले असून असंख्य कमेंट्स आल्या आहेत.

हरियाणवी डान्सर आणि सिंगर असलेली सपना चौधरी नवीन नाही. तिने तिच्या डान्सने आणि गायनाने लोकांच्या मनावर राज्य केले. पूर्व फक्त हरियाणातच ओळख असलेल्या सपनाने आता संपूर्ण जगात नाव कमावले आहे. सपनाला ‘तेरी आख्या का यो काजल’ या पहिल्या गाण्यातून अमाप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ती बिग बॉसमध्ये देखील स्पर्धक म्हणून सहभागी झाली. या शोने तिला अमाप लोकप्रियता मिळवून दिली. सपनाने हरियाणवीसोबतच भोजपुरी, पंजाबी आणि बॉलीवुड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सपनाला सोशल मीडियावरही तुफान फॅन फॉलोविंग असून, तिला ४.८ मिलियन लोक फॉलो करतात.

हेही वाचा-

Latest Post