‘देसी क्वीन’ सपना चौधरीने केला ‘टॉप टकर’ गाण्यावर धमाकेदार डान्स; पाहा व्हिडिओ

sapna choudhary dance on badshah top tucker song video breaking internet


‘देसी क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेली सपना चौधरी नेहमी तिच्या धमाकेदार डान्समुळे चर्चेत असते. सपनाला केवळ हरियाणातच नव्हे तर संपूर्ण भारतातही जबरदस्त प्रसिद्धी मिळाली आहे. हेच कारण आहे की, सपनाला डान्स परफॉर्मन्ससाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून ऑफर येत असतात.

नुकताच तिने स्वत:च्या घरात डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात सपना चौधरी बादशाहच्या नुकत्याच रिलीझ झालेल्या ‘टॉप टकर’ गाण्यावर जोरदार डान्स करत आहे. सपनाचा हा डान्स व्हिडिओ चाहत्यांना खूप पसंत पडला आहे.

सपनाचे व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत असतात. नुकतेच तिचा आणि राखी सावंतचा एकत्र डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये राखीला सपनाच्या डान्स स्टेप्स कॉपी कराव्या लागल्या होत्या.

सपना लवकरच एँड टीव्हीच्या ‘मौका-ए-वारदत’ या क्राईम शोमध्ये रवी किशन आणि मनोज तिवारीसोबत दिसणार आहे. ‘मौका-ए-वारदत’ वास्तविक स्थानांवर आधारित असणार आहे. या गुन्हेगारी मालिकेत कल्पित गुन्ह्यासह विविध कथा आणि त्यामागील रहस्ये, दृष्टीकोन आणि कार्यपद्धती उघड केल्या जातील.

सपना चौधरीच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने हरियाणाच्या ऑर्केस्ट्रा पार्टीपासून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. हळूहळू तिने हरियाणा आणि जवळपासच्या राज्यांमध्ये कार्यक्रमांना हजेरी लावायला सुरुवात केली आणि अशाप्रकारे तिच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढत होत गेली. त्यानंतर सपना चौधरी ‘बिग बॉस 11’ चाही भाग बनली. यामुळे तिच्या लोकप्रियतेत बरीच वाढ झाली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आहा! ईशा कोप्पीकरही झाली ट्रेंडमध्ये सामील, ‘पावरी हो रही है’ म्हणत शेअर केला मजेदार व्हिडिओ

-‘बुसीट चॅलेंज’ फॉलोव करत दीपिका पदुकोणने केला व्हिडिओ शेअर; ‘दीपवीरचा’ निराळा डान्स होतोय व्हायरल

-एकदम कडक! अमायरा दस्तूरने केला चक्क हील्स घालून डान्स; व्हिडिओवर प्रतिक्रियांचा पाऊस


Leave A Reply

Your email address will not be published.