हरियाणाची डान्सिंग क्वीन सपना चौधरी (Sapana Choudhary) तिच्या जबरदस्त डान्समुळे देशभरात लोकप्रिय आहे. आपल्या धमाकेदार डान्सने आणि घायाळ करणाऱ्या अदांनी ती नेहमीच सर्वांना वेड लावत असते. अनेक वर्षांपासून सपना चौधरीचे नाव सुपर डान्सर म्हणून घेतले जाते. परंतु आता हरियाणाची डान्सिंग क्विन सपना चौधरी यापुढे डॉ. सपना चौधरी म्हणून ओळखली जाणार आहे.काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.
सपना चौधरी तिच्या डान्समुळे देशभरात ओळखली जाते. आता त्यांच्यात आणखी एका यशाची भर पडली आहे. राजस्थानच्या NIMS विद्यापीठाने हरियाणवी नृत्यांगनाला डॉक्टर ऑफ फिलॉसॉफीची मानद पदवी देऊन सन्मानित केले आहे. कलाक्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल सपनाला ही पदवी देण्यात आली आहे. NIMS विद्यापीठाचे कुलपती बलवीर सिंग तोमर यांनी तिचा हा सन्मान केला आहे.
हा सन्मान मिळाल्यानंतर सपना चौधरी खूप आनंदी आहे.सपनाने निम्समध्ये पाठवलेल्या रुग्णांवर उपचार मोफत होतील, अशी मला आशा असल्याचे म्हणले आहे.सपनाच्या या विनंतीवर विद्यापीठाचे कुलपती बलवीर सिंग तोमर यांनीही तिला आश्वासन दिले आहे. सपना चौधरी मंगळवारी विद्यापीठाच्या सत्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आली होती. या कार्यक्रमात सपनाने तिच्या गाण्याने आणि डान्सने लोकांच्या खूप टाळ्या मिळवल्या. जयपूर-दिल्ली महामार्गावरील निम्स विद्यापीठात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
समोर आलेल्या माहितीनुसार सपना चौधरीने पाठवलेल्या रुग्णांवर NIMS विद्यापीठात उपचार केले जातील, तसेच त्यांच्याकडे पाठवलेल्या जास्तीत जास्त 50 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणही दिले जाईल. तोमर म्हणाले की, या विद्यार्थ्यांना मेडिकल आणि डेंटलसह 400 अभ्यासक्रमांपैकी कोणत्याही अभ्यासक्रमात प्रवेश दिला जाईल. दरम्यान डान्सर सपना चौधरीला खरी ओळख सलमान खानच्या बिग बॉसमधून मिळाली होती. या कार्यक्रमात सपनाने सर्वांचीच मने जिंकली होती. सपनाने बिग बॉस व्यतिरिक्त अनेक हिंदी चित्रपटातही काम केले आहे. तिचा सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग आहे. ज्यांच्याशी ती अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा –
- ठरल तर! राणादा पाठक बाईंनी लग्नासाठी निवडले ‘हे’ ठिकाण, हार्दिक जोशीने लग्नाबद्दल केला महत्वाचा खुलासा
- HIT Movie Trailer : राजकुमार रावच्या आगामी ‘हिट’ चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा धमाकेदार ट्रेलर आला समोर
- महाराष्ट्राच्या राजकारणावर फराह खानची प्रतिक्रिया म्हणाली, ‘आमच्या मताला काही महत्वच नाही’