सही हैं! तब्बल एक कोटी पंच्याहत्तर लाख हिट्स मिळालेलं ‘सपना चौधरी’चं ‘रोटीयां के टोटे’ गाणं पाहिलं का?

Sapna Choudhary new song Rotiya Ke Tote get hit on social media watch video


‘देशी क्वीन’च्या नावाने सर्वत्र प्रसिद्ध असलेली अभिनेत्री’ सपना चौधरी’ प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. तिचा एखादा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करता क्षणीच व्हायरल होऊन जातो. तिच्या चाहत्यांची संख्या देखील बरीच असल्याने तिला सोशल मीडियावर देखील भरभरून प्रेम मिळतं असत. सध्या ‘सपना चौधरी’चा अजुन एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सपना चौधरी हरियाणवी गाणे ‘रोटियां के टोटे’ या गाण्यावर स्टेज परफॉर्मन्स करताना दिसत आहे. तिचा हा स्टेज परफॉर्मन्स तिच्या फॅन्सला खूपच आवडला आहे आणि तिचे फॅन्स या व्हिडिओला खूपच चांगल्या प्रतिक्रिया देताना दिसतात.

सपना चौधरीच्या या डान्स व्हिडिओला ‘टशन हरियाणवी’ या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केले आहे. या व्हिडीओच्या लोकप्रियतेचा अंदाज आपण येथूनच लावू शकतो की, या व्हिडीओला आत्तापर्यंत 1 करोड 75 लाखापेक्षाही जास्त वेळा बघितले गेले आहे.

सपना चौधरीने तिच्या डान्सच्या जोरावर केवळ हरियाणामध्ये नाही तर संपूर्ण उत्तर भारतात तिची ओळख निर्माण केली आहे. म्हणूनच सोशल मीडियावर तिच्या फॅन्स फॉलोवर्सची संख्या देखील लाखोंच्या घरात आहे. सपनाला देशातील कानाकोपऱ्यातून डान्ससाठी ऑफर्स येत असतात. तिच्या या डान्समुळेच ती सगळीकडे प्रसिध्द झाली आहे. तसेच ती सोशल मीडियावर देखील तिच्या फॅन्ससोबत नेहमी जोडलेली असते.

सपना चौधरीच्या करिअरबद्दल बोलायचे झाल्यास, तिने हरियाणाच्या एका ऑर्केस्ट्रा पार्टीमधून तिच्या करिअरची सुरवात केली होती. त्यानंतर सपना हळूहळू हरियाणा आणि शेजारील राज्यांमधील अनेक ‘रागिणी’ च्या शोमध्ये सहभाग घ्यायला लागली आणि तिथूनच खरी तिच्या लोकप्रियतेला सुरवात झाली. सपना ‘बिग बॉस 11’ या पर्वात देखील स्पर्धक होती. बिग बॉस नंतर तिची लोकप्रियता तर आकाशला जाऊन पोहचली होती . नुकतेच सपना चौधरीचे ‘लोरी’ हे गाणे रिलीज झाले आहे. ते देखील सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत आहे.


Comments are closed.