आजकाल सगळेच सोशल मीडियाचा वापर करतात. अगदी सामान्य माणसांपासून ते मोठमोठ्या कलाकारांपर्यंत सगळ्यांना सोशल मीडियावर त्यांच्या आयुष्यातील गोष्टी शेअर करायला आवडते. कलाकार तर मोठ्या संख्येने सोशल मीडियाचा वापर करतात. यातच समावेश होतो तो म्हणजे हरियाणवी डान्सर सपना चौधरीचा. आता देखील सोशल मीडियावर सपनाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून तुम्ही हसून हसून लोटपोट होऊन जाल.
सपनाने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्या व्हिडिओमध्ये ती तिचे नुकतेच प्रदर्शित झालेले गाणे टीव्हीवर बघत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती हे गाणे बघता बघता फरशी पुसत आहे. ती घरात अगदी सध्या कपड्यात दिसत आहे. यासोबत बेडवर एका मुलाचे पाय देखील दिसत आहेत. कदाचित ते मूल सपनाचेच असावे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “कधी कधी स्वतःच्या एकांताचा देखील भरभरून आनंद घ्यावा.”
सपनाने शेअर केलेल्या या व्हिडिओवर तिचा चाहत्यांच्या खूप प्रतिक्रिया येत आहे. ग्लॅमरस सपनाला या अशा अवतारात पाहून तिचे सगळे चाहते हैराण झाले आहे. काहीजण हसण्याची ईमोजी पोस्ट करत आहेत, तर काहीजण म्हणतायेत, ‘छान!! तू अभिनेत्री असूनही घरातले सगळे काम करतेस.’ तर एका युजरने लिहिले आहे की, ‘तू देखील घरातली ही सगळी कामं करते का??’
याआधी जेव्हा सपनाच्या लग्नाबाबत सगळ्यांना समजले होते, तेव्हा त्यांनी तिला खूप ट्रोल केले होते. परंतु तिने तेव्हा सगळ्यांना खणखणीत शब्दात उत्तर दिले होते. त्यावेळी सपनाने एक फोटो शेअर करून लिहिले होते की, “मी माझ्या कामाने सर्वांना उत्तर दिले आहे. फालतूच्या गोष्टी बोलायची आणि ऐकायची मला सवय नाहीये. पुढे काय होईल हे फक्त पाहत राहा.”
मागच्या वर्षी करवाचौथच्या दिवशी सपनाने तिचा पती वीरसोबत एक फोटो शेअर केला होता. तिच्या या फोटोने देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या फोटोत तिने लाल रंगाची साडी घातली होती. तसेच भांगेत सिंदुर आणि गळ्यात मंगळसूत्र घातले होते. या सगळ्या साज शृंगारात ती खूपच सुंदर दिसत होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-पवन सिंगच्या बाथरूम सीन असलेल्या ‘या’ गाण्याने अर्ध्या तासातच ओलांडला ६ लाख व्ह्यूजचा टप्पा










