‘दिमाग का दही हो रहा हैं’, ‘ती’ गोष्ट व्हिडीओमध्ये दाखवत सपना चौधरीने साधला निशाना


सपना चौधरी डान्स आणि गाण्याच्या दुनियेतील लोकप्रिय नाव. सपनाचा डान्स आणि तिचा आवाज याचे फक्त हरियाणा आणि आजुबाजुच्याच परिसरात फॅन्स आहे असे नाही, तर संपूर्ण देशात तिचे चाहते पसरले आहेत. सपनाच्या सर्व गाण्यांना, डान्सला आणि तिच्या सोशल मीडियावरील व्हिडिओजला सर्वांचेच प्रचंड प्रेम मिळते. सपनाने तिच्या प्रतिभेच्या जोरावर तिचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. सपनाने नुकतंच तिचा एक फनी व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तो व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर ट्रेण्डिंगमध्ये असणारा एक व्हिडिओ म्हणजे #PawriHoRahiHai. हा व्हिडिओ सामान्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वांनाच भुरळ घालत आहे. या व्हिडिओवर सर्वच जणं त्यांचे व्हिडिओ तयार करत सोशल मीडियावर पोस्टही करत आहे. शिवाय या ट्रेन्डवर अनेक मिम्स देखील पाहायला मिळत आहे. अनेक कलाकारांनी त्यांचे #PawriHoRahiHai व्हिडिओ तयार केले आहेत. आता या यादीत डान्सर सपना चौधरीचा देखील समावेश झाला आहे. सपनाने नुकताच तिचा #PawriHoRahiHai हा व्हिडिओ अपलोड केला आहे.

सपनाने इंस्टाग्रामवर तिचा व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणते. ” ही मी आहे. ही माझी स्क्रिप्ट आहे आणि डोक्याचे दही होत आहे.” व्हिडिओला कॅप्शन देताना तिने लिहिले, ” डोक्याचे दही होत आहे.” तिचा हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. शिवाय तिचा या व्हिडिओमधील अंदाज आणि लूक्स सर्वांनाच आकर्षित करत आहे. सपनाने हा व्हिडिओ तिच्या सेटवर शूट केला असून, फॅन्सने हजारो लाइक्स देत व्हिडिओला पसंती दर्शवली आहे.

सपनाने हरयाणवी सोबतच भोजपुरी, पंजाबी आणि बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे. सपनाला प्रचंड लोकप्रियता मिळवून देण्यात बिग बॉसचा मोठा वाट आहे. शिवाय सपना तिच्या नवनवीन गाण्यांच्या व्हिडिओंमुळे नेहमी चर्चेत असते. यावर्षी तिने तिचे अनेक गाणे प्रदर्शित केले आहे. सपनाचे स्वतःचे एक यूट्यूब चॅनेल देखील आहे.

 

 


Leave A Reply

Your email address will not be published.