Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिनेत्री सारा अली खानने काश्मीरमध्ये जवानांची भेट घेऊन व्यक्त केली कृतज्ञता, फोटो होतोय व्हायरल

 

पतौडी घराण्याचा नवाब म्हणून सैफ अली खानला ओळखले जाते. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये सैफचा समावेश होतो. सैफची पहिली पत्नी अभिनेत्री अमृता सिंगने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले आहे. या दोघांची मुलगी सारा त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत त्यांची बॉलिवूडमध्ये काम करत आहे. कमी काळात तिने तिच्या अभिनयाने तिने आपले या क्षेत्रात स्थान पक्के केले. त्याचबरोबर चाहत्यांच्या मनात ही स्थान निर्माण केले आहे. सारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिला फिरण्याची खूप आवड आहे हे तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून आपल्या लक्षात येतेच. ती वेळ मिळाला की, लगेच विविध ठिकाणांना भेटी देत आणि सुट्ट्यांचा आनंद घेते.

ती नवनवीन ठिकाणचे सर्व फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच साराने तिच्या काश्मीर सहलीचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. या फोटोमध्ये साराने भारतीय लष्कराच्या सैनिकांसोबतचे देखील काही फोटो शेअर केले आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे फोटो साराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरीमध्ये शेअर केले होते. तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ती भारतीय सैनिकांसोबत दिसत असून, आणि त्यांच्या मागे भारतीय तिरंगा फडकवताना दिसत आहे.

Photo Courtesy: Instagram/saraalikhan95

अभिनेत्री सारा अली खानने हा फोटो शेअर करतांना भारतीय सैनिकांचे देश सेवेबद्दल आभार मानले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शन लिहिले की, “त्या नायकांना भेटून खूप आनंद झाला ज्यांनी आम्हाला सुरक्षित असल्याची जाणीव करून दिली. तुम्ही आमच्यासाठी जे काही करता त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.” साराच्या या फोटोला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. अनेकांनी हे फोटो शेअर देखील केले आहेत.

सध्या सारा काश्मीरमध्ये आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर सारा अभिनेता अक्षय कुमार आणि धनुषसोबत ‘अतरंगी रे’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. सारा या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे. या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली. मात्र हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख अजूनही अस्पष्ट आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

श्रीदेवी यांच्या हिट गाण्यावर जबरदस्त नाचली पाकिस्तानी अभिनेत्री आयजा खान

मंसूर अली खान पतौडींच्या पुण्यतिथी दिनी सोहा अली खान शर्मिला टागोर यांनी घेतले त्यांच्या कब्रचे दर्शन

फॅन्सला पुन्हा झाला बिग बॉस फेम सोनाली फोगट यांच्या जबरदस्त डान्सचा ‘दिदार’

हे देखील वाचा