बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) तिच्या बिनधास्त स्टाइलसाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि तिचे सुंदर फोटो शेअर करत असते, जे चाहत्यांना खूप आवडतात. अशा परिस्थितीत, साराची फॅन फॉलोविंग चित्रपटांपेक्षा सोशल मीडियामुळे जास्त आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. सारा कोणत्याही मुद्द्यावर आपले मत उघडपणे मांडते. सारा तिचे आई-वडील आणि त्यांच्या घटस्फोटाबद्दलही उघडपणे बोलली आहे. सैफपासून वेगळे झाल्यानंतर, अमृताने दोन्ही मुलांचा सांभाळ केला. अशा परिस्थितीत सारा तिच्या आईच्या खूप जवळ आहे.
अलीकडेच साराला विचारण्यात आले की, ती कधी आई अमृता सिंगसोबत लग्नाबद्दल बोलते का? तर यावर अभिनेत्रीने नकारार्थी उत्तर दिले. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सारा म्हणाली की, ती तिच्या आईशी लग्नाबद्दल कधीही चर्चा करत नाही. तिने सांगितले की, सध्या तिच्या आईची इच्छा आहे की, तिने केवळ कामावर लक्ष केंद्रित करावे. (sara ali khan reveal she does not talk about marriage plans with mother amrita singh know why)
मुंबईत एवढी जागा असूनही, तिला फक्त आईच्या खोलीतच आराम मिळतो, असेही साराने सांगितले. सारा म्हणाली की, ती जेव्हापासून अभिनेत्री बनली तेव्हापासून तिच्या आणि तिच्या आईमध्ये बर्याच गोष्टी सेम झाल्या आहेत. ती म्हणाली, “माझी आई एक अभिनेत्री आहे आणि ती नेहमीच असेल. जेव्हा मी कोलंबियामध्ये होते, तेव्हा मला वाटत नव्हते की, ती मला तितकी समजून घ्यायची, जितकी आता घेते.”
आईबद्दल बोलताना सारा पुढे म्हणाली, “आजही मला कोणाशीही काही बोलायचे असेल, तर ती माझी आई आहे. इतर कोणापेक्षा ती मला अधिक समजू शकते.”
सारा अली खानने २०१८ मध्ये सुशांत सिंग राजपूतसोबत ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नाही, परंतु सारा अली खानचे या चित्रपटातील काम प्रेक्षकांना आवडले. साराने तिच्या पहिल्याच चित्रपटातून चित्रपट जगतात वेगळे स्थान निर्माण केले. आता ती लवकरच आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमार आणि धनुषसोबत मुख्य भूमिकेत आहे.
हेही वाचा-