सोशल मीडिया आणि त्यावर कलाकारांच्या पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. कलाकारांच्या हटके पोस्टमुळे नेहमी ते मीडियामध्ये प्रकाशझोतात असतात. कलाकार देखील त्यांच्या पोस्ट या वेगळ्या कशा असतील याकडे बारकाईने लक्ष देतात आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर करतात. या पोस्ट फॅन्सच्या देखील पसंतीस पडतात यात वाद नाही.
‘दिसते तसे नसते’ ही म्हण बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानला अगदी तंतोतंत लागू पडते. जेव्हा तुम्ही तिचा हा व्हिडिओ पाहाल, तेव्हा तुम्हाला देखील हे नक्कीच पटेल. सारा सध्याच्या पिढीची आघाडीची अभिनेत्री आहे. सैफ अली खानची मुलगी ही ओळख तशीच ठेवत तिने स्वतःची एक अभिनेत्री म्हणून नवीन ओळख तयार केली आहे. बबली आणि क्यूट असणारी सारा खान अतिशय फिट आणि फाईन अभिनेत्री म्हणून देखील ओळखली जाते. अभिनयात येण्यापूर्वी गोलमटोल असणारी सारा आता चांगलीच बारीक झाली आहे. तिला पाहून कोणालाही वाटेल की, ही एकदम नाजूक आणि लेचीपेची आहे. मात्र, तिच्या दिसण्यावर जाऊ नका बरं का. ती बारीक दिसत असली, तरी तिच्यात खूप ताकद आहे.
खोटे वाटत असेल, तर तिने पोस्ट केलेला तिचा एक व्हिडिओ नक्की पाहा. सारा तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये असून, तिने फ्लोरल शॉर्ट ड्रेस घातला आणि ती चक्क एका जीन्स घातलेल्या मुलीला उचलण्याचा प्रयत्न देखील करत आहे. काही अंशी ती या प्रयत्नात यशस्वी देखील झालेली आहे. तिला हे करण्यासाठी कोणीतरी प्रोत्साहन देखील देत आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, या व्हिडिओवरून फॅन्सला तिच्या शक्तीचा अंदाज देखील आला आहे.
तिच्या या व्हिडिओवर फॅन्स आणि कलाकार कमेंट्स करत आहे. यासोबतच तिने तिच्या इंस्टा स्टोरीवर एक फोटो देखील शेअर केला असून यात ती भूताच्या अवतारात दिसत आहे.
साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच आनंद एल राय यांच्या ‘अंतरंगी रे’ मध्ये दिसणार आहे. शिवाय ती ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ सिनेमातही दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…









