‘सासर असावं तर अस्सं!’ शेतामध्ये सासू अन् सासूच्या सासूसोबतही थिरकताना दिसली मराठमोळी मानसी नाईक


‘वाट बघतोय रिक्षावाला’ गाण्यात थिरकत मानसी नाईकने लाखो प्रेक्षकांच्या काळजावर वार केला होता. प्रत्येकजण तिच्या अदांचा दिवाना आहे. लॉकडाउनच्या काळात इतर कलाकारांप्रमाणे, मानसी नाईकही सोशल मीडियावर आपला वेळ घालवत असते. वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून अभिनेत्री चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. तिचे व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

काही दिवसांपासून मानसीसोबत तिचा पती म्हणजेच प्रदीप खरेराही व्हिडिओमध्ये पाहायला मिळत होता. मात्र नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये मानसी चक्क तिच्या सासू बाईंसोबत दिसली आहे. यात तिची सासू आणि सासूची सासू देखील दिसली आहे. इतकेच नव्हे, तर तिने त्यांच्याकडून डान्सही करून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता की, या व्हिडिओमध्ये मानसी कशाप्रकारे तिच्या सासूसोबत ‘गजबन की तौर’ या गाण्यावर थिरकत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “सासूची सासू आणि सून, तीन पिढ्या एकत्र. खूप मजा आली जेव्हा आम्ही शेतामध्ये हा व्हिडिओ शूट करत होतो, जेव्हा मी त्यांना नाचायला भाग पाडलं. मी, मम्मीजी आणि दादी माँ. सासर असावं तर असं!” हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांमध्ये खूप पसंत केला जात आहे. त्यामुळे व्हिडिओवर मोठ्या संख्येने लाईक्स आलेले दिसत आहेत.

मानसी नाईकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने २००७ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गीतांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. मानसी अभिनयापेक्षा तिच्या नृत्य कौशल्यामुळे ओळखली जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बोल्ड एँड ब्युटीफुल! बीचवरील रेतीने माखलेली दिसली दिशा पटानी; बिकिनीतील बोल्ड फोटोचा इंटरनेटवर बोलबाला

बापरे बाप! ‘लूई विटॉन’ ब्रँडच्या महागड्या ड्रेसमध्ये दिसली सोनम कपूर; किंमत वाचून होतील बत्त्या गुल

-ऋचा चड्डाशी लग्न न करण्याबाबत अली फजलने सांगितले ‘मोठे’ कारण; म्हणाला, ‘आम्ही आधी पैसे…’


Leave A Reply

Your email address will not be published.