Saturday, December 7, 2024
Home कॅलेंडर कोरोना वॉरियर्सना ‘किंग खान’ने केली भरगोस मदत, राजकारण्यांकडून होतंय आफाट कौतुक!

कोरोना वॉरियर्सना ‘किंग खान’ने केली भरगोस मदत, राजकारण्यांकडून होतंय आफाट कौतुक!

शाहरुख खानने कोरोना काळात अनेक स्वरूपात सरकारला, प्रशासनाला आणि सामान्य लोकांना मदत केली. फक्त मुंबईच नाही तर भारतातील अनेक राज्य आणि शहरांमध्ये त्याने मदत केली. पीपीई किट देणे, जेवण उपलब्ध करून देणे, मास्क देणे तर कुठे आर्थिक मदत त्याने केली.

२०२० हे वर्ष कोरोनामुळे चांगलेच लक्षात राहील. कोरोनासारख्या महामारीने भारतात २०२० च्या सुरुवातीलाच प्रवेश केला आणि बघता बघता संपूर्ण देश घराच्या चार भिंतीत कैद झाला. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित केला. या सर्वात कठीण काळात सरकारला, प्रशासनाला आणि मुख्यत्वे लोकांना अनेक अडचणी येत होत्या. औषधें, पीपीई किट, मास्क, रुग्णांसाठी आवश्यक पलंग यांच्या सोबतच हातावर पोट असणाऱ्या लोकांना निवारा, अन्न, पाणी आदी गोष्टींची कमतरता होती. मात्र काही समाजसेवी संस्था, कलाकार, खेळाडू अशा अनेक लोकांनी पुढाकार आपल्या परीने सर्वाना मदत करायचा प्रयत्न केला. यात बॉलीवूडच्या ‘किंग खान’चाही समावेश होता.

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून शाहरुखने हरप्रकारे सर्वांची मदत केली. शाहरुखने याकाळात केलेली मदत ही रेडचिलीज एण्टरटेनमेन्ट, मीर फाऊंडेशन, आयपीएल टीम कोलकाता नाइट रायडर्स आदींच्या माध्यमातून केली. शाहरुखने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीला भरघोस आर्थिक मदत केली.
कोरोना वॉरियर्ससाठी त्याने पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना ५० हजार पीपीई किट मदत म्हणून दिले. शिवाय त्याने ५५०० हजार लोकांना जेवण देत एक किचन तयार करत त्या किचनच्या माध्यमातून दररोज २००० लोकांना जेवू घालायची सोय केली. शिवाय दिल्लीमध्ये मीर फाउंडेशनच्या वतीने २५०० लोकांना रोज जेवू घालण्याचे काम त्याने केले. कोरोना काळात क्वॉरंटाईन सेंटर बनवण्यासाठी शाहरुख आणि गौरी यांनी त्याचे खाजगी ऑफिस मुंबई महानगर पालिकेला दिले. त्यात ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांच्या गरजेनुसार सर्व सोयी करण्यात आल्या होत्या.

छत्तीसगडमधील कोरोना योद्ध्यांसाठी त्याने पीपीई किट उपलब्ध करून दिल्याची माहिती छत्तीसगडचे मंत्री टीएस सिंह देव यांनी देत शाहरुखचे आभार मानले आहे. नुकतेच शाहरुख खानने दिल्ली सरकारला ५०० remdesivir इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी यासाठी शाहरुखचे आभार मानले आहे.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा