Thursday, April 18, 2024

शाहरुख खानने केले महेश बाबूच्या ‘गुंटूर करम’ चित्रपटाचे कौतुक; म्हणाला, ‘या चित्रपटामुळे…’

महेश बाबूच्या (Mahesh Babu) ‘गुंटूर करम’ने रिलीज होताच कमाईचे अनेक विक्रम केले आहेत. या चित्रपटाला चांगले रिव्ह्यू मिळाले असून प्रेक्षकांनाही तो आवडला आहे. अशा परिस्थितीत महेश बाबूच्या चित्रपटाच्या चांगल्या व्यवसायासोबतच आणखी एका चांगल्या गोष्टीची भर पडली आहे. नुकतेच शाहरुखने या चित्रपटाची प्रशंसा करताना पोस्ट केली आहे.

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shahrukh Khan) ट्विटरच्या माध्यमातून या चित्रपटाचे कौतुक केले असून, हा चित्रपट पाहण्याची वाट पाहत असल्याचेही त्याने म्हटले आहे.

शाहरुखने महेश बाबूला ट्विट करून आणि टॅग करून चित्रपटाचा ट्रेलरही शेअर केला, त्याने लिहिले, “माझा मित्र महेश बाबू, मी गुंटूर करमची वाट पाहतोय.” त्याने पुढे चित्रपटाच्या वैशिष्ट्यावर भर दिला आणि लिहिले – अॅक्शन., इमोशन आणि विदाऊट. नि:संशय हा पूर्णपणे मास फिल्म आहे. शाहरुखने लिहिले की, हा चित्रपट आग लावेल.

शाहरुखच्या ट्विटवर कमेंट करताना महेश बाबूनेही त्याचे आभार मानले असून तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद असे लिहिले आहे. प्रत्युत्तरादाखल त्यानेही शाहरुख आणि त्याच्या कुटुंबावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

महेश बाबूचा गुंटूर करम हा सिनेमा १२ जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 41 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. महेश बाबू स्टारर ‘गुंटूर करम’ या चित्रपटाने अनेक चित्रपटांना टक्कर दिली आहे. यामध्ये तेजा सज्जाचा हनुमान आणि शिवकार्तिकेयचा आयलन आणि विजय सेतुपतीचा मेरी ख्रिसमस यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘मी नेहमी ज्याच्यावर अवलंबून राहू शकतो..’ इमरान हाश्मीने लेकासाठी केलेली हृद्यस्पर्शी पोस्ट व्हायरल
शिल्पा शेट्टीला साकारायची आहे गॅल गॅडोट-स्कार्लेटसारखी भूमिका; म्हणाली, ‘आपला समाज अजूनही पुरुषप्रधान आहे’

हे देखील वाचा