Wednesday, December 6, 2023

अबब! शाहिद कपूरने खरेदी केला ‘इतक्या’ कोटींचा बंगला, किंमत ऐकून तुमचेही होतील डोळे पांढरे

यावेळी शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मीरा राजपूत (Meera Rajput) त्यांच्या नवीन घरात दिवाळी साजरी करणार आहेत. दोघांनीही त्यांच्या नव्या घरात प्रवेश केला आहे. हे जोडपे जुहू येथील त्यांच्या सी-फेसिंग अपार्टमेंटमधून वरळी येथील त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले आहे. शाहिद-मीराने वांद्रे वरळी सी-लिंक येथे नवीन आलिशान घर घेतले आहे. जरी त्यांनी हे घर 2018 मध्येच विकत घेतले होते, परंतु 2019 मध्ये त्यांना त्याची मालकी मिळाली. त्यानंतर आता ते या नवीन घरात शिफ्ट झाले आहेत.

शाहिदच्या नवीन घराची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. शाहिदने हे घर 2018 मध्ये विकत घेतले आणि 2019 मध्ये त्याचा ताबा मिळाला. त्यानंतर त्यांना कुटुंबासह त्या घरात शिफ्ट व्हायचे होते, पण कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, पाच दिवसांपूर्वी ते आपल्या मुलांसह या नवीन घरात शिफ्ट झाले आहे. पूर्वीच्या घराप्रमाणे हे घरही वरळीच्या पॉश भागात समुद्रासमोर आहे. घरात प्रवेश करण्यापूर्वी एक छोटी पूजा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये फक्त घरातील लोकांचा सहभाग होता.

शाहिद आणि मीराने स्वतःच त्यांचे नवीन घर सजवले आहे. कोरोनाच्या कालावधीमुळे त्यांचे येथे स्थलांतर होण्यास विलंब झाला. याच कारणामुळे या घराच्या अंतर्गत सजावटीलाही वेळ लागला. पण आता सर्व काही सुरळीत असल्याने सर्व काम उरकून शाहिद आणि मीरा मुलांसह या घरात दाखल झाले आहेत. या घराची किंमत 58 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. शाहिद त्याच्या लक्झरी कार आणि बाइक कलेक्शनसाठी ओळखला जातो. शाहिदकडे जग्वार एक्सकेआर-एस, रेंज रोव्हर वोग कार, मर्सिडीज एएमजी एस-४०० सारख्या आलिशान कार आहेत.

त्याचबरोबर शाहिदने यावर्षी 3 कोटींची मेबॅक कार देखील खरेदी केली आहे. आता एवढ्या महागड्या गाड्या आल्या तर त्यांची देखभालही त्याच पद्धतीने करावी लागणार आहे. यासाठी शाहिदने 360 वेस्टमध्ये 6 पार्किंग स्लॉट खरेदी केले आहेत. या नवीन घरातही शाहिदने ५०० स्क्वेअर फूटची बाल्कनी ठेवली आहे. शाहिदने अपार्टमेंटच्या 42व्या आणि 43व्या मजल्याला जोडून हे नवीन घर बनवले आहे. मुलांच्या सुरक्षिततेमुळे शाहिद आणि मीराने नवीन घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

शाहिदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलताना, अभिनेता सध्या त्याच्या डिजिटल डेब्यू फर्गीची तयारी करत आहे, ज्याचे दिग्दर्शन कृष्णा डीके करणार आहे. त्याचबरोबर अली अब्बास जफरचा ब्लडी डॅडीही त्याच्या खात्यात आहे.

हेही वाचा- लग्नाच्या 4 वर्षांनंतर रणवीर अन् दीपिकाचं बिनसलं? वेगळे होण्याच्या बातम्यांवर स्पष्टच बोलला ‘एनर्जी किंग’
‘कॉफी विथ करण’मध्ये तापसी पन्नूला का बोलावले नाही? करण जोहरने पहिल्यांदाच केला मोठा खुलासा
फ्लॉप चित्रपटांमुळे घाबरला आयुष्मान; मानधनात केली मोठी कपात, एका चित्रपटासाठी घेणार ‘इतके’ कोटी

हे देखील वाचा