Saturday, March 15, 2025
Home बॉलीवूड ठरलं तर! बॉलीवूडचे करण-अर्जुन पुन्हा दिसणार एकत्र, सलमान-शाहरुख ‘या’ चित्रपटात करणार काम

ठरलं तर! बॉलीवूडचे करण-अर्जुन पुन्हा दिसणार एकत्र, सलमान-शाहरुख ‘या’ चित्रपटात करणार काम

किंग खान शाहरुख आणि दबंग खान सलमानचं नातं नेहमीच प्रेक्षकांमध्ये चर्चिलं जातं. त्यांचा एकमेकांवरील राग असो किंवा जिवाभावाची मैत्री असो, प्रेक्षकांनी त्यांच्या प्रत्येक भावनेला नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला आहे. या दोघांच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आणि आता आनंदाची बातमी अशी आहे की, बऱ्याच दिवसानंतर ते दोघेही एकत्र काम करणार आहेत.

सलमान आणि शाहरुख हे दोघेही लवकरच ‘पठाण’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ते दोघे किती वेळ एकत्र सीनमध्ये असतील याबद्दल काही फारशी माहिती नाहीये. पण प्रेक्षक त्या दोघांना एकत्र पाहाण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत. काही दिवसांपुर्वी यशराज स्टुडिओच्या बाहेर दोघांच्याही गाड्या शेजारी शेजारी उभ्या होत्या आणि याचमुळे ही गोष्ट सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली.

यशराज स्टुडिओच्या बाहेर लावलेल्या त्या दोघांच्या आलिशान गाड्याबद्दल सोशल मीडियावर एवढी चर्चा होत आहे, त्या गाड्यांबद्दल बोलायचे झाल्यास, सलमानकडे रेंजरोव्हर ही गाडी आहे. तिची किंमत १ कोटी ८७ लाख एवढी आहे, तर शाहरुख खानची बीएमडब्ल्यू आय टेन ही गाडी आहे, जीची किंमत 2 कोटी एवढी आहे.

हे दोघेही सुपरस्टार खूप ऐशो आरमाचं आयुष्य जगत आहेत. त्यांनी चित्रपटात केलेले काम असो किंवा बाहेरच्या त्यांच्या कृती असोत, त्या नेहमीच प्रेक्षकांना प्रभावित करतात. तसं बघायल गेल तर, ते दोघेही खूप कमी वेळा एकत्र स्क्रीनवर दिसले आहे. करण-अर्जुन या सुपरहिट चित्रपटामधून ते नावारूपाला आले. त्या चित्रपटाने या जोडीला खूप प्रेम दिले

माध्यमांतील काही वृत्तांनुसार, सलमान खान आणि शाहरुख खान यांचा ‘पठाण’ हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. आता यासाठी प्रेक्षकांना थोडीशी वाट बघावी लागणार आहे.

शाहरुख खान हा ‘पठाण’ या चित्रपटामधून जवळपास दोन वर्षांनंतर चित्रपटात काम करणार आहे. मागच्या वर्षी त्याने ‘झिरो’ या चित्रपटात काम केले होते. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. अनेक फ्लॉप चित्रपटांनंतर शाहरुख खानने चित्रपट सृष्टीतून जरा ब्रेक घेतला होता. परंतु 2022 मध्ये तो नव्या जोमाने प्रेक्षकांसमोर येणार आहे.

हेही वाचा-

बीग बॉसच्या पार्टीमध्ये अर्शी खानचा ड्रेस पाहून सलमान हसू आवरेना, म्हणाला,  तू तर बिग बॉसचा सोफाच घालून आलीय 

जेव्हा लातूरच्या महिलेने केला होता शाहरुख  तीचा मुलगा असल्याचा दावा, कोर्टात गेली होती केस

सलमान जी राखी सावंतच्या कँसरग्रस्त आईचा  भाईजानसाठी भावुक मेसेज; व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

हे देखील वाचा