‘सलमान जी…’, राखी सावंतच्या कँसरग्रस्त आईचा ‘भाईजान’साठी भावुक मेसेज; व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

Bollywood Actress Rakhi Sawant Mother Said Salman Ji Thank You Son Watch Video


‘कँसर’ या भनायक रोगामुळे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काहींनी यावर मात केली आहे. दुसरीकडे काहीजण अजूनही या भयानक रोगाचा सामना करत आहेत. त्यातीलच एक म्हणजे बॉलिवूडची अभिनेत्री राखी सावंत हिची आहे. राखीची आई देखील कँसरग्रस्त आहे. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल केले आहे, तिथे त्यांच्यावर केमोथेरपी सुरू आहे. ‘बिग बॉस १४’मधून बाहेर पडल्यानंतर राखी पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिची आई भाईजान सलमान खानला धन्यवाद देताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राखीने शेअर केलेल्या या व्हिडिओत तिची आई म्हणते की, “सलमानजी, धन्यवाद बेटा. सोहेलजी धन्यवाद. माझ्यावर केमोथेरपी सुरू आहे. मी आता रुग्णालयात आहे. आज ४ केमोथेरपींपैकी झाल्या, २ बाकी आहेत. यानंतर ऑपरेशन होईल. देव तुमचं भलं करो आणि तुम्हाला सुखात ठेवो.”

यापूर्वीही राखीने आपल्या आईचे फोटो शेअर केले होते. यावेळी तिने चाहत्यांना आपल्या आईसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. यानंतर चाहतेही तिच्या आईसाठी प्रार्थना करू लागले आहेत.

दुसरीकडे गुरुवारी (२५ फेब्रुवारी) तिची मैत्रीण कश्मिरा शाहही राखीच्या आईला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचली होती.

प्रसिद्ध टीव्ही शो ‘बिग बॉस १४’ मध्ये राखीच्या एंट्रीने सर्वांचे मनोरंजन केले होते. या शोमध्ये तिने टॉप५ मध्ये स्थान मिळवले होते. दुसरीकडे नुकतेच झालेल्या शोच्या फिनालेमध्ये राखीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. कारण ती फिनालेमधून १४ लाख रुपये घेऊन बाहेर पडली होती. यावर्षी बिग बॉस १४ ची विजेती रुबीना दिलैक बनली, तर दुसऱ्या क्रमांकावर राहुल वैद्य आणि तिसऱ्या क्रमांकावर निक्की तांबोळी होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सलमान जी…’, राखी सावंतच्या कँसरग्रस्त आईचा ‘भाईजान’साठी भावुक मेसेज; व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल-भोजपुरी गायक नीलकमल सिंगचं होळीवरील नवीन गाणं रिलीझ; इंटरनेटवर करतंय धमाल, पाहा व्हिडिओ

-रेकॉर्ड ब्रेक युट्यूबर अंकित यादवचा नवा विक्रम, ‘त्या’ गाण्याला मिळाल्या तब्बल ६४ कोटी हिट्स


Leave A Reply

Your email address will not be published.