सुहाना खानच्या नव्या व्हिडिओने चाहत्यांमध्ये उडाली झोप, न्युयार्कच्या रस्त्यावर शेअर केला बेस्टीज बरोबरचा व्हिडीओ

shahrukh khan daughter suhana khan spent quality time with bff shared video gone viral


बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना खान ही सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. पडद्यावर चित्रपट येण्यापूर्वीच सुहानाची सोशल मीडियावर जोरदार फॅन फॉलोइंग आहे. त्यावरून असा अंदाज बांधला जाऊ शकतो की तिने अपलोड केलेला एक फोटोही बातमीची हेडलाईन बनवायला पुरेसा आहे. असावा पण का नाही! बादशाह खानच्या मुलीच्या फोटोवर चाहते भरभरून प्रतिसाद देत असतात.

Photo Courtesy : Instagram/suhanakhan2/

नुकतेच, सुहानाने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याने सोशल मीडिया वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. बघता बघताच हा व्हिडिओ इंटरनेटवर तूफान व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये ती न्यूयॉर्कमध्ये तिच्या ‘बेस्ट फ्रेंड फॉरएव्हर’ (BFF) सोबत वेळ घालवताना दिसत आहे.

Photo Courtesy : Instagram/suhanakhan2/

दरम्यान, 20 वर्षीय सुहाना खान अन्य तीन मैत्रिणींसह दिसली आहे. या चारजणी कॅमेर्‍याकडे पाहत आहेत आणि हसून पोजही देत आहेत. यावेळी त्यांची स्टाईल पाहण्यासारखी आहे. तसेच, सुहाना यात खूप सुंदर दिसत आहे. तिचे केस खुले आहेत आणि काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये ती उठून दिसत आहे.

सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र सध्या ती न्यूयॉर्कमध्ये फिल्म मेकिंगचा अभ्यास करत आहे. सुहानाशिवाय शाहरुखचा मोठा मुलगा आर्यन देखील आपल्या मोहक लूकने इंटरनेटवर चाहत्यांची मने जिंकत असतो.

Photo Courtesy : Instagram/suhanakhan2/

त्याचवेळी, वडील शाहरुख खानबद्दल बोलायचे झाले, तर तो लवकरच मोठ्या स्क्रीनवर धमाल करण्यास तयार आहे. ‘पठाण’ चित्रपटाच्या माध्यमातून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात दीपिका पादुकोण देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही चौथी वेळ असेल जेव्हा दीपिका आणि शाहरुख एकत्र स्क्रीन शेअर करतील.


Leave A Reply

Your email address will not be published.