Saturday, June 29, 2024

नाद केला पण पुरा केला! शाहरूख खानच्या ‘जवान’ने पहिल्याच दिवशी छापले ‘एवढे’ कोटी

बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध अभिनेता म्हणजे शाहरुख खान होय. शाहरुख खानने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. शाहरुख खानचे चाहते देशातच नव्हे तर परदेशातही लाखो आहेत. शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या चित्रपटाची क्रेझ प्रचंड मोठी होती. या दरम्यान शाहरुख खानचा बहुचर्चित चित्रपट ‘जवान’ गुरूवारी (7 सप्टेंबर) प्रदर्शित झाला आहे.

‘जवान’ (Jawan) चित्रपट संपूर्ण भारतातील थेटरमध्ये झळकत आहे. शाहरुख खानच्या जवान चित्रपटाची जादू लोकांना वेड लावत आहे. पहिल्यांदाच पहाटे 5 वाजता बॉलिवूड चित्रपटाचा शो सुरु झाला आहे. जवान चित्रपटाची क्रेझ प्रचंड वाढली आहे. शाहरुख खानचे चाहते थेट मिरवणूक काढत जवान चित्रपट पाहायला जात आहेत. थेटर मधून बाहेर पडतात सर्वजण जवान चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहे. ‘जवान’ चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगमद्ये जवळपास 14 लाख तिकीट विक्री केली गेली आहे.

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली आहे. माध्यमातील वृत्तानुसार पहिल्याच दिवशी भारतात जवान चित्रपटाने 75 कोटी कमावले आहेत. या दरम्यान हा चित्रपट विकेंपर्यंत 300 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जगभरातील कलेक्शन बद्दल बोलायचं झालं तर, जवान चित्रपटाने जवळपास 120 कोटी रुपये कमावले आहे.

‘पठाण’ चित्रपटानंतर शाहरुख खानने मोठ्या ब्रेकनंतर ‘जवान’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पुनरागमन केले आहे. या चित्रपटात नाहीतर सोबत शाहरुख खान दिसत आहे. ‘जवान’ चित्रपट हिंदी तमिळ आणि तेलगू भाषेत रिलीज झाला आहे. ‘जवान’ चित्रपटांमध्ये शाहरुख खान सोबत प्रसिद्ध अभिनेत्री नायतारा प्रमुख भूमिकेत दिसत आहे. तर दक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारताना दिसत आहे. याचबरोबर या चित्रपटात बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण पाहूण्या कलाकारच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. (ShahRukh Khan Jawaan minted Eddha crores on its first day)

अधिक वाचा-
‘तुझ्याकडे एकच ड्रेस आहे का?’ राजेश्वरीच्या व्हिडिओवर नेटकऱ्याची कमेंट; अभिनेत्री म्हणाली, ‘अजून 15 दिवस…’
इंडिया आणि भारत वादादरम्यान खिलाडी अक्षय कुमारनं उचलले मोठे पाऊल; म्हणला…

हे देखील वाचा