Monday, October 2, 2023

आता सुट्टी नाही! दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘जवान’चाच डंका, कमाईचा आकडा उडवेल तुमचीही झोप

बहुचर्चीत चित्रपट ‘जवान‘ अखेर 7 सप्टेंबरला प्रेक्षकाच्या भेटीला आला आहे. या क्षणाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. शाहरुख खानच्या ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर धडकताच एवढा धुमाकूळ घातला की, या चित्रपटाने आतापर्यंत चांगली कमाई करणाऱ्या मागील सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले. शाहरुख खानचा ‘जवान‘ चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. लोकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ इतकी आहे की, क्वचितच असा कोणताही सिनेमा हॉल असेल ज्यामध्ये शाहरुखच्या एंट्रीवर टाळ्या वा शिट्ट्या वाजवल्या नसतील.

सगळीकडे शाहरुखचा (Shahrukh Khan) आवाज घुमत आहे. जन्माष्टमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ने (Jawan )पहिल्याच दिवशी चांगला व्यवसाय केला. आता चित्रपटाचे दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन आले आहे. या चित्रपटाने 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. शाहरुख खानचा ‘जवान’ अ‍ॅक्शनने भरलेला आहे. या चित्रपटात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मनमोकळेपणाने बोलताना दिसले आहे. यासोबतच शाहरुख नयनताराची जोडीलाही चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

SRKच्या मॅनेजर पूजा ददलानी यांनी जगभरातील कलेक्शनचे आकडे शेअर केले आहेत, ज्यात असे सांगण्यात आले आहे की, ‘जवान’ चित्रपटाने पहिल्या दिवशी 129.6 कोटी कमावले. त्याचबरोबर दुसऱ्या दिवसाचे कलेक्शनही सोशल मीडियावर समोर आले आहे. ‘जवान’ चित्रपटाने दोन दिवसांत जगभरात 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. ‘जवान’ या वर्षातील सर्वात मोठी ओपनिंग घेणारा बॉलिवूड चित्रपट बनला आहे.

या चित्रपटाने उत्तर अमेरिकेत 10 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. यामध्ये चित्रपटाने USA मधील 676 ठिकाणांहून 8.51 कोटी रुपये आणि कॅनडातील 86 ठिकाणी 2.78 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 11.29 कोटी झाले आहे. जवानाबद्दल बोलायचे झाले तर, त्यात शाहरुख खान जबरदस्त भूमिका करताना दिसत आहे. तर नयनतारा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली आहे. (Shahrukh Khan Jawan earned 200 crores on the second day)

अधिक वाचा-
‘त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा..’, नाना पाटेकर यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत
अभिनेत्री शिल्पाने पती राज कुंद्राच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला ‘तो’ भन्नाट व्हिडिओ; म्हणाली…

हे देखील वाचा