Thursday, September 28, 2023

‘जवान’च्या ‘या’ ग्लॅमरस अभिनेत्रीने नेटकऱ्यांना लावले वेड; बोल्ड बिकिनी फोटो झाले व्हायरल

प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा बहुचर्चीत ‘जवान‘ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबरला रिलीझ झाला आहे. या चित्रपटातून शाहरूखने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरिजा ओक, संजीता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोगरा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सिनेमा हॉलमध्ये बसलेले प्रेक्षक जेव्हा संजय दत्तची एंट्री ‘जवान’मध्ये ( jawan ) झाली तेव्हा आश्चर्यचकित झाले. संजय दत्तच्या एंट्रीवर चित्रपटगृहांमध्ये शिट्ट्या वाजल्या आहेत. या चित्रपटात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेली अभिनेत्री म्हणजे आलिया कुरेशी होय. आलिया कुरेशीने(Alia Qureshi) शाहरुख खान आणि नयनतारा स्टारर ‘जवान’ या चित्रपटात जान्हवीची सहाय्यक भूमिका साकारली आहे.

 ‘जवान’च्या जान्हवीने बॉलिवूडमध्ये फारसे चित्रपट केले नाहीत, पण शाहरुखच्या या चित्रपटात आलियाने आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांची मने जिंकली आहेत. सध्या आलिया सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. या चित्रपटाच आलिया खूपच सुंदर दिसत आहे. पण तुम्हाला माहित आहे का की खऱ्या आयुष्यात देखील आलिया तितकीच सुदंर आहे. आलियाच्या इंस्टाग्रामनर नजर टाकली तर तिने बरेच बिकिनीमधील फोटो पोस्ट केले आहेत.

 या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की आलिया कुरेशी बीचवर काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये किती सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीच्या चेहऱ्याचे सौंदर्य चाहत्यांना वेड लावत आहे. आलिया कुरेशीने ‘हवा हवा’ या बॉलिवूड चित्रपटात अभिनेत्री म्हणूनही काम केले आहे. पण आता शाहरुख खानच्या ‘जवान’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी आलिया भविष्यात आणखी अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहे. आलिया कुरेशीला अभिनयासोबतच गाण्याचीही खूप आवड आहे. (Bold photo of actress Alia Qureshi, who played the supporting role of Janhvi in ​​Shah Rukh Khan Jawan, went viral)

अधिक वाचा-
‘जवान’च्या वादळात उडून गेला ‘गदर 2’, चांगले रिव्ह्यू मिळूनही केली फक्त ‘एवढी’ कमाई
काय सांगता! अभिनेत्री समांथा रुथ प्रभू करणार राजकारणात प्रवेश? वाचा संपूर्ण प्रकरण

हे देखील वाचा