Monday, October 2, 2023

अभिनेत्री शिल्पाने पती राज कुंद्राच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला ‘तो’ भन्नाट व्हिडिओ; म्हणाली…

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राने तिच्या अभिनच्या जोरावर खूप प्रसिद्ध मिळवली आहे. तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. शिल्पा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. शनिवारी (9 सप्टेंबर) बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राचा वाढदिवस आहे. या खास प्रसंगी अभिनेत्रीने त्याला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

‘सुखी’ या आगामी चित्रपटातून लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा (Shilpa Shitty) रुपेरी पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर शिल्पा शेट्टीचे लग्न उद्योगपती राज कुंद्रासोबत (Raj Kundra) झाले होते. तसेच, आता या जोडप्याला दोन मुले आहेत. विआन राज कुंद्रा आणि समिशा शेट्टी कुंद्रा ही त्यांची मुल आहेत. आज ही अभिनेत्री तिच्या पतीचा वाढदिवस साजरा करत आहे. या आनंदाच्या प्रसंगी, अभिनेत्रीने पती राज कुंद्रासाठी एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे आणि शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री शिल्पाने तिच्या इंस्टाग्रामवर राज कुंद्रासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना शिल्पाने लिहिले की, “या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला एक आरसा भेट देत आहे, जेणेकरून मी जे पाहते ते तुम्ही पाहू शकता. मजेदार, दयाळू, विचारशील आणि प्रेम करणारे कोणीतरी एक सुंदर व्यक्ती जो माझ्यासाठी परिपूर्ण आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझी कुकी. सुरक्षित आणि आनंदी रहा.”

 अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती पती राज कुंद्रासोबत हातात हात घालून ती फिरताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ‘युही काट जायेगा सफर साथ चलने से’ हे गाणे ऐकू येत आहे. केवळ शिल्पाच नाही तर तिच्या चाहत्यांनीही राज कुंद्राचे अभिनंदन केले आहे. लोकांनी शिल्पाच्या पोस्टवर कमेंट करत राज कुंद्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Actress Shilpa shared this amazing video on her husband Raj Kundra birthday)

अधिक वाचा-
आज हरपलं देह भान! भगवी वस्त्र अन् भस्म लावून अक्षय कुमारने घेतले महाकालेश्वराचे दर्शन; पाहा व्हिडिओ
‘त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा..’, नाना पाटेकर यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

हे देखील वाचा