शाहरुख खान अर्थात बॉलिवूडचा किंग खान. शाहरुख समोर सर्वच कलाकार फिके पडतात. त्याला किंग खान, बादशाह म्हटले जाते. ते काही उगाच नाही. तो त्याच्या फॅन्सच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर राज्य करतो. त्याचे फॅन्स भारतात नाही तर संपूर्ण जगात पसरलेले आहे. स्व बळावर बॉलिवूडमध्ये करियर करणाऱ्या शाहरुख खानने रोमँटिक हिरो बनत प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतला. यावर्षी शाहरुख जरी बऱ्याच वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आला तरी त्याचा चार्म आणि त्याची क्रेझ यत्किंचितही कमी झालेली नाही. मात्र तुम्हाला माहित आहे का की, लोकांच्या मनावर राज्य करणारा शाहरुख कमाईच्या बाबतीतही मागे नाही. कमाईच्या बाबतीत त्याने मोठमोठ्या कलाकारांना मागे टाकले असून, जगातील सर्वात श्रीमंत अशा कलाकारांमध्ये तो पाचव्या स्थानावर आहे.
View this post on Instagram
आजचा दिवस शाहरुख खानच्या फॅन्ससाठी आनंदाचा डबल डोस देणारा ठरला. एकीकडे आज शाहरुखच्या बहुप्रतिक्षित ‘पठाण’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. तर दुसरीकडे तो जगातील सर्वात श्रीमंत अशा टॉपच्या पाच कलाकारांच्या यादीत सामील झाला आहे. शाहरुख खानने या रेस मध्ये बॉलिवूडच्या नव्हे तर हॉलिवूडच्या देखील स्टार्सला मागे टाकले आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक ने जाहीर केलेल्या यादीत शाहरुख खानचे नाव सामील झाले आहे.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिकने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून जगातील आठ श्रीमत अशा कलाकारांची यादी पोस्ट केली आहे. या यादीमध्ये भारतातील केवळ शाहरुख खानचेच नाव सामील आहे. यायादीत तो चौथ्या स्थानी असून, त्याने जॅकी चॅन आणि टॉम क्रूझला देखील मागे टाकले आहे. या यादीला अनुसरून शाहरुख खानचे एकूण नेटवर्थ ७७० मिलियन डॉलर आहे. भारतीय रुपायंडमध्ये ६ हजार ३०० कोटींची त्यांची संपत्ती आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे कसलं ते दुर्देव! अभिनेता ऋतिक रोशनने ज्या चित्रपटांची ऑफर धुडकावली तेच ठरलेत सुपरहीट
हॅपी बर्थडे कल्की! अनुराग कश्यपसोबत ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडच्या मुलीला दिला जन्म, वाचा अभिनेत्रीबद्दल