Sunday, June 4, 2023

वाढदिवस | बिग बींना आपले आजोबा मानतो शाहरुखचा चिमुकला अबराम! बराच रंजक आहे तो किस्सा

शाहरुख खानचा (Shahrukh Khan) छोटा मुलगा अबराम (Abram Khan) आज त्याचा ९ वा वाढदिवस साजरा करत आहे. अबराम हा अशा स्टारकिड्सपैकी एक आहे, जो आपल्या क्यूटनेसमुळे खूप चर्चेत असतो. अबरामला अनेकदा त्याचे वडील शाहरुख खानसोबत स्पॉट केले जाते. अबरामचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. को केवळ त्याचे पालक शाहरुख खान आणि गौरीच नाही, तर भाऊ आर्यन आणि बहीण सुहाना यांचाही लाडका आहे.

पण फार कमी लोकांना माहिती आहे की, अबराम लहान असताना तो अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना आजोबा मानत होता. हा खुलासा खुद्द अमिताभ बच्चन यांनीच केला होता.

खरं तर, १७ नोव्हेंबर २०१८ रोजी अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय यांची मुलगी आराध्याचा ७वा वाढदिवस होता. यावेळी एका खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या बर्थडे पार्टीत शाहरुख खान अबरामसोबत गेला होता. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी पोस्ट करून या घटनेचा खुलासा केला होता की, अबराम त्यांना आपले आजोबा मानतो. (shahrukh khan son abram celebrating 9th birthday)

त्यांनी पोस्ट करून म्हटले होते की, “हा शाहरुख खानचा छोटा अबराम आहे. जो कोणत्याही शंकाशिवाय विचार करतो आणि मानतो की मी त्याचा आजोबा आहे. शाहरुख खानचे वडील त्याच्यासोबत का राहत नाहीत, हे त्याला जाणून घ्यायचे आहे.” अमिताभ बच्चन यांनी हा फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये अबराम अमिताभ बच्चन यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसत आहे. त्याच्या या फोटोला शाहरुख खाननेही रिप्लाय दिला होता. त्याने अमिताभ बच्चन यांना घरी येत-जात राहण्याची विनंती केली होती.

शाहरुख खानने केली होती विनंती
शाहरुख खान म्हणाला होता, “सर येत जावा ना! कृपया किमान शनिवारी तरी अबरामसोबत रहा..त्याच्या आयपॅडवर अनेक चांगले गेम आहेत. तुम्ही त्याच्यासोबत डूडल जंप देखील खेळू शकता.” शाहरुख खानच्या या गोड उत्तराने चाहत्यांची मने जिंकली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा