Monday, July 1, 2024

बिकिनी घालून पोहणाऱ्या ‘या’ कोरिओग्राफरने लावली पाण्यात आग

कलाकार आणि सोशल मीडिया यांचे खूपच घनिष्ठ नाते आहे. कलाकारांसाठी तर सोशल मीडिया सर्वात मोठा रोल पार पाडत असते. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांना ओळख मिळाली. सोशल मीडियावर सक्रिय राहून आपले अकाऊंट अपडेट करणे देखील आजच्या तारखेला महत्वाचे काम आहे. कलाकार अनेकदा त्यांना वेळ मिळाला की, कुठे तरी फिरायला जातात आणि दैनंदिन जीवनाच्या रुटीनमधून ब्रेक घेतात. या सुट्ट्यांचे फोटो सोशल मीडिया टाकणे खूपच ट्रेंडिंगमध्ये असते. कलाकारांच्या सुट्ट्या आणि त्यांच्या सुट्ट्यांचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या अशाच एका प्रतिभावान कलाकाराच्या सुट्ट्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच गाजताना दिसत आहे.

प्रसिद्ध आणि लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक असणाऱ्या शक्ती मोहनने नुकत्याच तिच्या डेली रुटीनमधून ब्रेक घेत सुट्ट्यांचा आनंद घेतला आहे. आपल्या अतिशय धमाकेदार आणि आकर्षक डान्समधून सर्वांची मने जिंकणारी शक्ती अतिशय लोकप्रिय कोरिओग्राफर आहे. कोरिओग्राफीसोबतच डान्स शोचे परीक्षण करतानाही ती दिसून येते. तिच्या डान्सची असलेली प्रतिभा पाहून अनेकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

मात्र शक्तीने तिच्या सुट्ट्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तिचा ग्लॅमरस आणि मादक अंदाज लोकांसमोर आला आहे. शक्तीने तिच्या गर्ल गॅंगसोबत जंगलात जाऊन क्वाल‍िटी टाईम घालवला आहे. यावेळचे अनेक फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शक्ती जंगलात दिसत असून, ती जंगलातील नदीमध्ये पोहण्याचा आनंद घेत आहे. यावेळी शक्ती काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. शक्तीचा हा बिकिनी अवतार पहिल्यांदाच समोर आल्याने तिच्या या सिजलिंग अवतारावर नेटकरी घायाळ झाले आहेत. या फोटोंमध्ये शक्तीने काळ्या रंगाची ब्रा आणि काळ्या रंगाची शॉर्ट्स घातली आहे.

शक्तीने तिच्या या बोल्ड बिकिनीवर लॉन्ग हुप्स घातले असून, गॉगल घालून ती पोहताना दिसत आहे. दाट झाडांमध्ये आणि दगडांमधून वाहणाऱ्या नितळ नदीत पोहणाऱ्या शक्तीचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. शक्तीने तिचे हे फोटो पोस्ट करताना लिहिले, “आपण जीवनापासून सुटण्यासाठी प्रवास करत नाही, पण आयुष्य आपल्यापासून सुटू नये म्हणून प्रवास करतो.” मात्र यामध्ये शक्तीने कुठेही ती नक्की कोणत्या जागेवर गेली आहे याचा उल्लेख केला नाही.

शक्तीच्या या फोटोंवर कलाकारांसोबत तिचे फॅन्सदेखील कमेंट्स करताना दिसत आहे. या फोटोंवर शक्तीची बहीण असलेल्या मुक्तीने लिहिले की, “हाय मेरी जलन जलसुंदरी’ तर तिच्या फॅन्सपैकी एकाने लिहिले, “आफत” तर एकाने तिला ‘अप्सरा’ म्हटले आहे. यासोबतच अनेकांनी या फोटोवर हार्ट आणि फायर ईमोजी देखील पोस्ट केल्या आहेत.

शक्त‍ि मोहन डान्स इंड‍िया डान्स सीजन २ ची विजेती होती. या शोनंतर ती अनेक डान्स रियॅलिटी शोज मध्ये दिसली. तिने नचले वे विद सरोज खान, डान्स इंड‍िया डान्स सीजन ३, इंड‍ियाज डान्सिंग सुपरस्टार, झलक दिखला जा, डान्स प्लसच्या चारही पर्वांमधे तिने सहभाग घेतला होता. शक्तीने तीस मार खान, राऊडी राठोड, सुकून, धूम 3, कांची, सम्राट एंड कंपनी, पद्मावत, नवाबजादे आदी अनेक चित्रपटांसाठी तिने नृत्यदिग्दर्शन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मुकेश अंबानींच्या घरात दगडांसाठीही आहे एसी? अभिनेत्री श्रेया धन्वंतरीने रंजक किस्सा केला शेअर

-असं कुणासोबतही होऊ नये! ‘एड्स’मुळे जीव गमावणारे प्रसिद्ध कलाकार, एका भारतीय अभिनेत्रीचाही समावेश

-‘बिग बॉस ओटीटी’ फेम मूस जट्टानाने व्हर्जिनिटीवर सोडले आपले मौन, दिला महिलांचा आदर करण्याचा सल्ला

हे देखील वाचा