Saturday, July 27, 2024

‘बिग बॉस ओटीटी’ फेम मूस जट्टानाने व्हर्जिनिटीवर सोडले आपले मौन, दिला महिलांचा आदर करण्याचा सल्ला

बॉलिवूड ते छोट्या पडद्यावर झळकणाऱ्या कलाकारांपर्यंत अनेकजण हल्ली कोणत्या कारणामुळे चर्चेत येतील, त्याचा काही नेम नाही. कधी ते त्यांच्या आलिशान राहणीमानामुळे, तर कधी देशात चाललेल्या मुद्द्यावर आपले मत मांडल्यामुळे चर्चेचे धनी ठरतात. यामध्ये आणखी एका कलाकाराचा समावेश झाला आहे. ‘बिग बॉस ओटीटी’तून प्रेक्षकांमध्ये आपली ओळख निर्माण केलेली मूस जट्टाना एका पोस्टमुळे चर्चेत आहे.

मूसने अतिसंवेदनशील असलेल्या व्हर्जिनिटी (कौमार्य) विषयाबद्दलच्या भारतीय व्यक्तींच्या विचारांवर आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. मूसने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दाखवले आहे की, भारतात लोकं लग्नासाठी मुलगी कशाप्रकारे शोधतात. इतकेच नव्हे, तर तिने मुलींना आणि महिलांना आयुष्य बिनधास्त जगण्याचा आणि आनंदी राहण्याचा आशीर्वाद दिला आहे. मूसने स्वत: अप्रामाणिक, उद्धट आणि निर्लज्ज असल्याचे लिहिले आहे. सोबतच तिने म्हटले आहे की, तिला आनंद आहे की, तिला कोणाचीही आई स्वीकारणार नाही. मूसच्या या पोस्टवर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. काहींनी तिला ट्रोलही केले आहे, तर काहीजण तिला पाठिंबा देत आहेत. (Moose Jattana Says Virginity Is A Myth Treat Women Well If You Want To Stand Out It World)

‘नसते कोणतीही सील’
“कौमार्य ही एक दंतकथा आहे. कोणतीही सील नसते, एक स्नायू असते, जी मोठी झाल्यावर तुटते. त्याबद्दल जाणून घ्या. मात्र, तुमच्या स्त्रिया आणि मुलींना या समस्येने कमी लेखू नका. देवाचे आभारी आहे की, मी बंद मनाच्या भारतीय कुटुंबासाठी कधीही सुसंस्कृत होऊ शकणार नाही. देवाला धन्यवाद. कृतज्ञतापूर्वक, मी अप्रामाणिक, उद्धट आणि निर्लज्ज आहे. परंपरेच्या आणि अपेक्षांच्या नावाखाली अशा निरुपयोगी साखळदंडात त्यांनी जखडून ठेवू नये, हीच माझी प्रत्येक मुलीसाठी, स्त्रीसाठी प्रार्थना आहे,” असे ती म्हणाली.

‘या’ गोष्टीसाठी दिल्या शुभेच्छा
“तुम्हा सर्व बहिणींच्या उत्तम आयुष्यासाठी मी प्रार्थना करते. मी तुम्हाला अद्भुत सेक्सचा आशीर्वाद देते. खूप जवळीक, प्रयोग आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रार्थना करा. कोणालाही आपल्या इच्छांना रोखू देऊ नका. मला आशा आहे की, आपण संपूर्ण जग पाहू शकता. मी प्रार्थना करते की तुमचा जोडीदार तुमची भांडी धुवेल, तो पलंग आवरेल, तो पलंग आवरेल, ती पलंग तयार करेल. तुम्ही मुक्त आणि पूर्ण जीवन जगावे, अशी माझी इच्छा आहे. मी प्रार्थना करते की, तुमच्या जोडीदाराने तुमच्यावर खूप प्रेम करावे,” असेही ती पुढे बोलताना म्हणाली.

आदराची काळजी वाटते, तर महिलांचा आदर करा
अनेक नकारात्मक कमेंट्सवर तिने लिहिले की, “किती हास्यास्पद गोष्ट आहे की, पुरुष याबाबत बचाव करण्यासाठी पुढे येतात की, ‘सर्व भारतीय असे नसतात.’ मात्र, त्यांना या गोष्टीचा राग येणार नाही की, त्यांच्या देशात महिलांसोबत कशाप्रकारे वागले जात आहे. जर तुम्हाला खरंच भारतीयांच्या इज्जतीची चिंता आहे, तर आपल्या महिलांना चांगल्याप्रकारे वागणूक द्या आणि शांत बसा.”

अनेकांनी तिला पाठिंबा देत तिची प्रशंसा केली आहे. एका युजरने लिहिले की, “अशी इच्छा ऐकून गॉसिप करणाऱ्या आँटींनाही हृदयविकाराचा झटका येईल.”

मूसबद्दल बोलायचं झालं, तर ती अमेरिकन अभिनेत्री आणि टिक-टॉक स्टार आहे. ती अवघी २० वर्षांची आहे. मूस जट्टाना तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर महिलांचे हक्क आणि समाजातील प्रमुख समस्यांवर निर्भयपणे व्हिडिओ बनवते. तसेच, ती तिच्या स्वत:च्या नावाने युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करते. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मूस ऑस्ट्रेलियाहून दिल्लीत निषेधासाठी आली. मूस जट्टानाने आपले शालेय शिक्षण भारतात पूर्ण केले आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे गेली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जय गंगाजल’च्या ‘त्या’ सीननंतर ढसाढसा रडू लागली होती प्रियांका चोप्रा, मग अभिनेत्याने…

-बोनी कपूर यांची इंस्टाग्रामवर एन्ट्री, मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी इंस्टावर आल्याचे अर्जुन कपूरने म्हणणे

-पोलिस म्हणून सलमान खानला आवडते ‘ही’ खास व्यक्ती; अभिनेत्याने सांगितले काही किस्से

हे देखील वाचा