Saturday, June 15, 2024

मुकेश अंबानींच्या घरात दगडांसाठीही आहे एसी? अभिनेत्री श्रेया धन्वंतरीने रंजक किस्सा केला शेअर

आजकाल मोठमोठ्या लोकांच्या घरात एसी लावणे ही सर्वसाधारण बाब झाली आहे, पण तुम्ही कधी ऐकले आहे का? की, फुले आणि दगडांसाठीही एसी लावला जातो? कदाचित हे जरा विचित्र वाटेल. मात्र, देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या आलिशान घराच्या ‘अँटिलिया’मध्ये असे घडते. अभिनेत्री श्रेया धन्वंतरीने हा मोठा खुलासा केला आहे. श्रेया ‘द फॅमिली मॅन’, ‘स्कॅम १९९२’सारख्या अनेक वेब सीरिजमध्ये दिसली आहे.

श्रेया एका कार्यक्रमासाठी त्यांच्या घरी गेली होती. या कार्यक्रमाला अमिताभ बच्चनही उपस्थित होते. श्रेयाने सांगितले की, जेव्हा ती ‘अँटिलिया’मध्ये होती, तेव्हा तिला खूप थंडी जाणवत होती. त्यांनी एसीचे टेमप्रेचर वाढवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, उत्तर ऐकून तिला परतावे लागले. श्रेयाने सांगितले की, तिला आश्चर्य वाटले की, लोकांची लाईफस्टाईल अशी देखील असू शकते की, ती कल्पनाही करू शकत नाहीत.

काही वर्षांपूर्वी ‘अँटिलिया’ला गेली होती श्रेया
मुकेश अंबानींचे नाव जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समाविष्ट आहे. त्यांच्या लाईफस्टाईल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. मॉडेल-अभिनेत्री श्रेयाने ‘द लव्ह लाफ लाइव्ह शो’ दरम्यान एक मजेशीर गोष्ट सांगितली. तिने सांगितले की, ती काही वर्षांपूर्वी मुकेश अंबानींच्या घरी गेली होती. “अबू जानी आणि संदीप खोसला इंडस्ट्रीत १० वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत होते. त्यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशनही होत होते. इव्हेंटमध्ये ५० मॉडेल्सना बोलावण्यात आले. ज्यांनी वर्षानुवर्षे डिझाईन केलेले कपडे परिधान केले होते. मी त्या ५० पैकी एक होते, तर आम्ही तिथे होतो आणि अमिताभ बच्चन शोस्टॉपर होते. त्यांच्याशी बोलताना खूप मजा आली.”

‘कमी कपडे केले होते परिधान’
श्रेयाने सांगितले की, तिला खूप थंडी वाजत होती. ती म्हणते, “मी आत आले, मी जास्त कपडे घातले नव्हते. तिथे फ्लोअर मॅनेजर होते, म्हणून मी त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले, आपण तापमान थोडे वाढवू शकता का? यावर त्यांनी उत्तर दिले, मॅडम, माफ करा, पण इथल्या फुलांना आणि मार्बल्सलाही ठराविक तापमान लागते. मी उत्तर दिले, मग ठीक आहे आणि मी परत गेले.”

श्रेयाने इमरान हाश्मीसोबत केले पदार्पण
श्रेया म्हणते, “मला काही हरकत नव्हती. कारण, मला जेव्हा जीवन जगणाऱ्या किंवा ज्या गोष्टींची मी कल्पनाही करू शकत नाही. अशा लोकांना भेटते, तेव्हा मला ते खूप मनोरंजक वाटते.”

श्रेयाने इमरान हाश्मीसोबत ‘व्हाय चीट इंडिया’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने मिस इंडिया २००८ स्पर्धेत भाग घेतला आणि मॉडेल म्हणून काम केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जय गंगाजल’च्या ‘त्या’ सीननंतर ढसाढसा रडू लागली होती प्रियांका चोप्रा, मग अभिनेत्याने…

-बोनी कपूर यांची इंस्टाग्रामवर एन्ट्री, मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी इंस्टावर आल्याचे अर्जुन कपूरने म्हणणे

-पोलिस म्हणून सलमान खानला आवडते ‘ही’ खास व्यक्ती; अभिनेत्याने सांगितले काही किस्से

हे देखील वाचा