बहीण शमिता शेट्टी आली शिल्पाच्या समर्थनार्थ; पोस्ट शेअर म्हणाली, ‘जे काहीही झाले…’


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि पॉर्न ऍपप्रकरणी १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. राज कुंद्राला २३ जुलैला मुंबईच्या मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्याच्या पोलिस कोठडीत २७ जुलैपर्यंत वाढ केली असून, राज कुंद्रासह त्याचा सहकारी रेयान थार्प याच्याही पोलिस कोठडीत २७ जुलैपर्यंत वाढ झाली आहे. यासर्व गोंधळात शिल्पाचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘हंगामा २’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शिल्पा १४ वर्षांनी चित्रपटात दिसली आहे. या निमित्ताने तिची बहीण शमिता शेट्टीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, तिची हिंमत वाढवली आहे.

शमिताने तिच्या इंस्टावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, “ऑल द बेस्ट माझी लाडकी मुनकी. १४ वर्षांनी प्रदर्शित होणाऱ्या तुझ्या ‘हंगामा २’ सिनेमासाठी खूप प्रेम. मला माहित आहे, तू या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली आहे. संपूर्ण टीमनेच केली आहे. लव्ह यू. मी नेहमीच तुझ्यासोबत आहे. तू तुझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मी एक गोष्ट नक्कीच सांगू शकते की, यामुळे तू नेहमी अधिक ताकदवान झाली आहेस. ही वेळ देखील निघून जाईल माझी डार्लिंग. संपूर्ण टीमला शुभेच्छा.” (shamita shetty shares support note to sister shilpa shetty)

पुढे शमिताने तिच्या पोस्टमध्ये शिल्पाची पोस्ट ऍड करत लिहिले, “मी नेहमीच योगामधून मिळणाऱ्या शिकवणीवर विश्वास ठेवते आणि ती शिकवण अंमलात देखील आणते. जीवन जे कुठे असेल तर ते या क्षणात आहे. ‘हंगामा २’ला एक चांगला सिनेमा बनवण्यासाठी या सिनेमाच्या टीमने खूप मेहनत घेतली आहे. जे काहीही झाले तरी सिनेमाला त्याचे नुकसान होता कामा नये. म्हणून मी तुम्हाला विनंती करते, हा सिनेमा बनवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी तुम्ही सर्वांनी तुमच्या कुटुंबासह हा सिनेमा नक्की बघा.”

राज कुंद्राच्या अश्लील ऍपसंदर्भात मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलच्या टीमने शुक्रवारी २३ जुलैला राजची आणि पत्नी शिल्पा शेट्टीची चौकशी केली. दरम्यान, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

कार्तिक आर्यनच्या नव्या चित्रपटाची घोषणा; आता पायलट बनून अभिनेता जिंकणार रसिकांची मनं

राज कुंद्रा प्रकरणात शिल्पा शेट्टीचा ‘हंगामा २’ झाला प्रदर्शित; चित्रपटावर होणार परिणाम?

‘आयुष्यभर तुरुंगात सड’ म्हणत राज कुंद्रावर आरोप लावणारी पुनीत कौर नक्की आहे तरी कोण? वाचा


Leave A Reply

Your email address will not be published.