गीता बाली यांच्या निधनानंतर ‘या’ अटीवर शमी कपूर यांनी केले होते नीला देवी यांच्याशी दुसरे लग्न

बॉलिवूडमध्ये आजपर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. भारतीय चित्रपटांना जागतिक ओळख मिळवून देण्यात या कलाकारांनी खूप मोठे योगदान दिले. बॉलिवूडमध्ये ज्या घराण्याने बॉलिवूडला ओळख मिळवून दिली, बॉलिवूडला महत्व प्राप्त करून दिले ते घराणे म्हणजे ‘कपूर घराणे’. पृथ्वीराज कपूर यांनी सुरु केलेला हा कलेचा वारसा त्यांच्या वारसदारांनी अगदी उत्तम पद्धतीने सांभाळला. याच कपूर घराण्यातील एक अभिनेते म्हणजे शमी कपूर. शमी कपूर यांनी त्यांच्या अभिनयाने आणि हटके डान्स स्टाईलने सर्वांचे मने जिंकली. शमी यांना बॉलिवूडचे ‘एल्विस प्रिसली’ म्हटले जाते. त्यांनी त्यांच्या दमदार डान्सने बॉलिवूड डान्सला नवीन ओळख मिळवून दिली.

आज शमी कपूर यांची जयंती आहे. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईमध्ये शमी कपूर यांचा जन्म झाला. त्यांनी चित्रपटांमध्ये अभिनय करत जबरदस्त डान्सने सर्वांना वेड लावले. आजही त्यांच्या डान्सचे अनेक दिवाने आपल्याला पाहायला मिळतील. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती.

शमी कपूर यांचा जन्म होताना त्यांच्या आईवडिलांना खूपच भीती वाटत होती, कारण राज कपूर यांच्या जन्मानंतर झालेली दोन्ही मुले दुर्दैवाने मरण पावली होती. कपूर घराण्यातील शमी कपूर हे पहिले असे बाळ होते ज्यांचा जन्म हॉस्पिटलमध्ये झाला होता. शमी कपूर यांच्या जन्मानंतर पृथ्वीराज कपूर यांनी त्याचे नाव शमशेर राज कपूर ठेवले, मात्र नंतर ते शमी कपूर झाले.

बॉलिवूडमध्ये अभिनेता होण्याआधी शमी कपूर हे ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करायचे. त्यांना ५० रुपये पगार देखील मिळायचा. त्यांनी त्यांच्या ‘पृथ्वी’ थिएटरमध्ये देखील काम केले. महान पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा असूनही, त्यांना कधीही स्टारकीड सारखी ग्रँड लाँचिंग मिळाली नाही.

शमी कपूर यांनी महेश कौल यांच्या १९५३ साली आलेल्या ‘जीवन ज्योती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमाच्या मुख्य अभिनेत्री चांद उस्मान होत्या. शमी कपूर यांना या सिनेमासाठी ११००० रुपये मिळाले होते. शमी कपूर यांनी एका पाठोपाठ एक असे अनेक फ्लॉप सिनेमे दिले, मात्र तरीही त्यांच्याकडे कधीही कामाची कमतरता नव्हती.

शमी कपूर यांना १९६१ साली आलेल्या ‘जंगली’ या सिनेमाने तुफान लोकप्रियता मिळवून दिली. या सिनेमातील ‘याहू’ या गाण्यावरील त्यांचा डान्स आणि हे गाणे आजही तुफान लोकप्रिय आहे. जेव्हा भारतामध्ये याहू नावाचे सर्च इंजिन आले, तेव्हा लोकांना वाटले की, ते शमी कपूर यांचेच आहे.

शमी कपूर यांचे करिअर तुफान गाजले आणि हिट देखील झाले. त्यांचे जेवढे व्यावसायिक जीवन प्रसिद्ध होते, तेवढेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील गाजले. सर्वांनाच माहित होते की, शमी कपूर यांना मुमताज खूपच आवडत होत्या. ते दोघे लग्न सुद्धा करणार होते, मात्र शमी कपूर यांनी मुमताज यांना सांगितले की, त्यांनी लग्नानंतर चित्रपटात काम करणे बंद करावे. याच अटीमुळे मुमताज यांनी शमी कपूर यांचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला.

पुढे काही काळाने त्यांना काम करता करता गीता बाली आवडायला लागल्या. मात्र गीता बाली या शमी कपूर यांच्यापेक्षा मोठ्या होत्या. कपूर घराण्याने देखील या लग्नाला विरोध दर्शवला. पण शमी कपूर यांनी ठरवले की त्यांना गीता यांच्याशीच लग्न करायचे होते. म्हणून त्यांनी परिवाराच्या विरोधात जाऊन मंदिरात गुपचूप लग्न केले. असे म्हटले जाते की, गीता बाली यांना भांगेत भरायला कुंकू मिळाले नाही, म्हणून शमी यांनी त्यांना लिपस्टिक लावली होती. पण लग्नाच्या १० वर्षांनी गीता बाली यांचा मृत्यू झाला. पुढे त्यांनी नीलादेवी यांच्याशी लग्न केले.

शमी कपूर आणि गीता बाली यांना आदित्य राज कपूर आणि कांचन कपूर ही दोन मुलं झाली. गीता यांच्या निधनानंतर शमी कपूर दुःखात बुडाले. त्यांनी स्वतःकडे लक्ष देणे बंद केले. त्यांचे वजन वाढायला सुरुवात झाली आणि नायक म्हणून त्यांच्या करिअरवर त्याचा प्रीतम होऊ लागला. त्यांची परिस्थिती पाहून घरातील लोकांनी त्यांच्यावर दुसरे लग्न करण्याचा दबाव टाकला, अखेर शमी दुसऱ्या लग्नाला तयार झाले आणि गीता बाली यांच्या निधनानंतर चार वर्षांनी त्यांनी नीला देवी यांच्याशी लग्न केले. नीला देवी या राज घराण्यातल्या होत्या.

मात्र नीलादेवी यांच्याशी लग्न करताना शमी कपूर यांनी त्यांच्यापुढे एक अट ठेवली होती. अट अशी होती की, त्या कधीही त्यांचे मूल जन्माला घालणार नाही. नीला देवी यांनी ही अट मान्य केली आणि त्यांचे लग्न झाले.

शमी कपूर यांचा रणबीर कापुरवर खूप जीव होता. योगायोगाने शमी कपूर यांचा अखेरचा सिनेमा रणबीर बरोबरच ठरला. २०११ साली शमी ‘रॉकस्टार’ या सिनेमात अखेरचे दिसले. १४ ऑगस्ट २०११ रोजी शमी कपूरनं यांचे निधन झाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आर्यनच्या अटकेवर प्रसिद्ध निर्मात्यांनी व्यक्त केले दु:ख; म्हणाले, ‘बिचारा मुलगा खूप…’

-‘हाय प्रोफाइल असण्याची किंमत मोजावी लागते’, म्हणत जावेद अख्तर यांनी व्यक्त केली आर्यनची चिंता

-‘या’ कारणामुळे शाहरुखने आपल्या लाडक्याचे नाव ठेवले होते ‘आर्यन’, मुलीशी आहे कनेक्शन

Latest Post