Wednesday, July 2, 2025
Home अन्य अरुणिता अन् पवनदीपला पछाडून ‘ही’ स्पर्धक बनू शकते ‘इंडियन आयडल १२’ची विजेती

अरुणिता अन् पवनदीपला पछाडून ‘ही’ स्पर्धक बनू शकते ‘इंडियन आयडल १२’ची विजेती

देशातील सर्वात मोठा सिंगिंग रियॅलिटी शो म्हणजे ‘इंडियन आयडल’ होय. हा शो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय बनत असतो. नुकतेच या शोमधील लोकप्रिय स्पर्धक सवाई भट्ट आणि अंजली गायकवाड हे शोमधून बाहेर गेले आहेत. त्यामुळे प्रेक्षक खूप नाराज झाले आहेत. लोकांनी या शोबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. यासोबतच त्यांनी प्रेक्षकांना देखील पक्षपाती म्हटले आहे. या शोमध्ये एक अशी स्पर्धक आहे, जिला या शोमधून बाहेर काढा अशी सारखीच मागणी होत आहे. परंतु शोमधील एका परफॉर्मन्सने सगळे चित्रच बदलले आहे. (Shanmukhpriya can win the Indian ideol 12 show give tough fight to pawandeep and Arunita)

ही स्पर्धक दुसरी तिसरी कोण नसून शनमुखप्रिया ही आहे. जिला अनेकवेळा तिच्या गाण्यांवरून ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. सवाई भट्ट या शोमधून बाहेर गेल्यानंतर शनमुखप्रियाला प्रेक्षकांनी खूप ट्रोल केले होते. परंतु आता लोकांना तिच्यामध्ये एक चांगली गायिका दिसायला लागली आहे. या सगळ्याची सुरुवात तेव्हापासून झाली, जेव्हा जावेद अख्तर या शोमध्ये पाहुणे बनून आले होत. त्यांनी तिच्या गायनाचे खूप कौतुक केले. अनेक वेळा सर्वात जास्त पवनदीप आणि अरूणिता यांचे परीक्षक कौतुक करत असतात. आता सगळे प्रेक्षक अशी आशा लावून बसले आहेत की, या शोचा नक्की विजेता कोण असणार आहे. आता या विजेत्यांच्या यादीत मागील काही दिवसांपासून शनमुखप्रियाचे नाव सामील झाले आहे.

या आठवड्यात गीतकार जावेद अख्तर यांना इंडियन आयडलच्या मंचावर ट्रिब्युट दिला जाणार आहे. जावेद अख्तर या शोमध्ये खास पाहुणे म्हणून आले आहेत. त्यावेळी त्यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. यासोबत त्यांनी शनमुखप्रियाच्या गाण्याचे देखील कौतुक केले. त्यानंतर शनमुखप्रियाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलले. त्यावेळी आदित्य नारायणने देखील सांगितले की, तो शनमुखप्रियासोबत सिंगिंग कॉन्सर्टची वाट बघत आहे.

शनमुखप्रियाला या शोमध्ये खूप ट्रोल केले आहे. तिच्या गायनासाठी अनेक वेळा सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया येत असतात. माध्यमातील वृत्तानुसार, शनमुखप्रियाने ट्रोलिंगवर प्रत्युत्तर दिले होते. तिने सांगितले की, या ट्रोलिंगमुळे तिला तिच्या चाहत्यांबद्दल माहिती मिळाली. शनमुखप्रियाची आई तिला खूप पाठिंबा देत असते. तिने ट्रोलरला उत्तर देत सांगितले की, “शनमुखप्रियाला वेगवेगळ्या शैली प्राप्त आहेत. जिथे गाण्यांना निवडण्याचा प्रश्न आहे. तिची निवड चांगली आहे आणि ते तिच्या चाहत्यांना आवडते.”

शनमुखप्रियाला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जाते. पण ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही की, तिने अनेक वेळा उत्कृष्ट गाणी गाऊन अनेक स्पर्धकांना मागे टाकले होते. या शोमध्ये आधी अरुणिता आणि पवनदीप यांना विजेता म्हणून पाहिले जात होते, परंतु शनमुखप्रियाची गाणी आता प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. ती या शोमध्ये पुढे चालली आहे. यावेळी परीक्षकांवर असा आरोप देखील लावला जात होता की, ते पक्षपाती आहेत. परंतु जावेद अख्तर या शोमध्ये आले आणि त्यांनी शनमुखप्रियाचे जसे कौतुक केले आहे त्यावरून असा अंदाज लावला जात आहे की, कदाचित ती हा शो जिंकू शकते.

तिने ‘जिंदगी ना मिलेगी दोबरा’ या चित्रपटातील ‘सॅनोरिटा’ हे गाणे गायले. तिने नेहमीच हाय पिच वाली गाणी गायली आहेत. त्यामुळेच तिला सोशल मीडियावर ट्रोल करतात. परंतु या सगळ्या परिस्थितीचा सामना करत ती इथपर्यंत आली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘क्रेझी किया रे’, प्रिया बापटच्या दिलखुलास स्मितवर चाहते झाले फिदा

वयाच्या अवघ्या ९व्या वर्षी संगीतबद्ध केलं होतं पहिलं गाणं; तर बराच रंजक होता आर डी बर्मन यांचा जीवनप्रवास

‘माझा होशील ना’ फेम गौतमी देशपांडेच्या ग्लॅमरस लूकने चोरली लाखो मने; एक नजर टाकाच

हे देखील वाचा