शरद केळकर म्हणतोय, ‘मला भांडी घासायला आवडतात’; मजेशीर व्हिडिओ पाहून नेटकरीही झाले लोटपोट!


अभिनेता शरद केळकर हा सिनेसृष्टीतला प्रतिभावान अभिनेता आहे. त्याने अभिनयाच्या जोरावर त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजवर अनेक चित्रपटात उल्लेखनीय भूमिका साकारून त्याने मोठा चाहतावर्ग कमावला आहे. ‘लक्ष्मी’ चित्रपटात किन्नरच्या भूमिकेत शरद केळकरचे बरेच कौतुक झाले होते. यात तो पाहुणा कलाकार म्हणून दिसला होता. याशिवाय ‘तानाजी’ मधील त्याच्या अभिनयानेही सर्वांना प्रभावित केले होते.

आता हा अभिनेता सोशल मीडिया खूप सक्रिय राहतो. त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून तो नेहमी चाहत्यांचे मनोरंजन करतो. त्याचे मजेदार व्हिडिओ बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात. पुन्हा त्याचा एक मजेदार व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून चाहत्यांमध्ये चांगलाच हशा पिकला आहे.

शरदने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि अभिनेत्री कीर्ती केळकर देखील दिसली आहे. यात ते दोघे ‘घातक’ चित्रपटातील सनी देओलच्या प्रसिद्ध डायलॉगवर अभिनय करताना दिसत आहेत. तुम्ही पाहू शकता की, शरद कॅमेऱ्यात बघून म्हणत असतो की, “हा कामगाराचा हात आहे कातीया.” तेव्हा कीर्ती येते आणि म्हणते की, “जा मग जाऊन भांडी घास.” तिने असे म्हणताच शरद लगेच किचनमध्ये निघून जातो. (sharad kelakar shared video and said i like washing dish see funny video)

हा मजेदार व्हिडिओ शेअर करत शरदने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “मला भांडी घासायला आवडतात.” हा मजेशीर व्हिडिओ पाहून नेटकरी देखील लोटपोट झाल्याचे पाहायला मिळत आहे. हसण्याचे ईमोजी पोस्ट करून चाहते या व्हिडिओवर भरभरून प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तसेच या व्हिडिओवर ५५ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मला माहितीये लोक माझ्या वडिलांचा तिरस्कार करतात…’; #meetoo बाबत आलिया कश्यपने केले तिचे मत व्यक्त

-राज कुंद्राच्या सांगण्यावरून अनेक प्रोडक्शन हाऊस बनवत होते पॉर्न व्हिडिओ; ७० पेक्षाही अधिक लोक लागले पोलिसांच्या हाती

-जान्हवी कपूरने स्टेजवर चुलती महीप कपूरसोबत लावले ठुमके; ‘नदियों पार’ गाण्यावरचा परफॉर्मेंस तूफान व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.