×

शहनाज गिलच्या नवीन फोटोंनी नेटकऱ्यांच्या काळजाचा चुकवला ठोका, उन्हात दिल्या पोझ

हिंदी चित्रपट जगतात तसेच टेलिव्हिजन जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या चित्रपटातील कामांपेक्षा सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. या अभिनेत्री सोशल मीडियावर आपल्या सोशल अकाउंटवरुन नेहमीच विविध पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात रहात असतात. यामध्ये अभिनेत्री शहनाज गिलच्याही (Shehnaaz Gill) नावाचा प्रामुख्याने समावेश होतो. शहनाज गिलचे सध्या असेच बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तिच्या हॉट लूकने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे .

बिग बॉस १३‘ पासून टिव्ही अभिनेत्री शहनाज गिल सर्वत्र चर्चेत आली होती. या कार्यक्रमात शहनाजने सर्वांचेच लक्ष वेधले होते. तेव्हापासून शहनाज विविध कारणांनी सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या बोल्ड फोटोंची नेहमीच चर्चा माध्यमांमध्ये रंगलेली असते. शहनाजने अलिकडेच केलेले फोटोशूट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असून यामधील तिचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. या नव्या फोटोंमध्ये शहनाजने लाल रंगाचा कॉर्सेट टॉप घातला आहे.  लाल रंगाच्या टॉपमध्ये खूपच मनमोहक दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

या फोटोमध्ये शेहनाज गिलने कॉर्सेट टॉपसोबत हाय वेस्ट बेज पॅंन्ट घातली आहे. तिच्या या फोटोंमध्ये ती खूपच मनमोहक दिसत आहे. मोकळे सोडलेले केस आणि हलकासा मेकअप यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडत आहे. रखरखत्या उन्हात काढलेले शहनाजचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत. या व्हायरल फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत तिच्या मनमोहक सौंदर्याचे कौतुक केले आहे.दरम्यान अभिनेत्री शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्लाच्या (siddharth shukla) मैत्रीचीही सिने जगतात चर्चा रंगली होती. सिद्धार्थच्या जाण्याने शहनाजवर दुखाःचा डोंगर कोसळला होता. मात्र आता ती त्यातून सावरताना दिसत आहे. तसेच लवकरच ती सलमान खानसोबत (salman khan) चित्रपटातही झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post