Sunday, May 19, 2024

लोकप्रियता मिळताच शेहनाज गिलचा वाढला भाव? ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीने दिले चोख प्रत्युत्तर

अभिनेत्री शहनाज गिल तिच्या स्टाईलने लोकांना वेड लावते. बिग बॉस 13 मधील शहनाज गिलला चाहत्यांनी खूप पसंत केले आहे. स्वत:ला पंजाबची कतरिना कैफ म्हणवून घेणाऱ्या या अभिनेत्रीने आपल्या मेहनतीनेच इंडस्ट्रीत स्थान निर्माण केले आहे. सध्या शहनाज गिल (Shehnaaz gill) तिच्या आगामी ‘थँक्स फॉर कमिंग’ या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापासून तिचा चॅट शो आणि संगीत व्हिडिओ होस्ट करण्यापर्यंत, अभिनेत्री यशाच्या शिखरांपर्यंत जात आहे. पण शहनाज गिलला लोकप्रियता मिळाल्यानंतर तिला भाव आल्याचे म्हटले जात आहे. लोक अभिनेत्रीला अहंकारी देखील म्हणत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शहनाज गिलने तिरस्कार करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले.

अभिनेत्री म्हणाली की, “माझे खूप मोठे फॅन फॉलोइंग आहे पण काही लोक माझा तिरस्कार करतात आणि मला ट्रोल करतात. लोकांना वाटते की शहनाज जे काही करते ते खरे नाही. सगळे खोटे आहे पण त्यांनी माझे व्यक्तिमत्व पाहिले नाही. मी खूप अनोखी आहे, लोक हे पचवू शकत नाहीत. लोकांना वाटते की मी गोंडस असल्याचे भासवत आहे, पण भाऊ मी खरोखरच आहे.”

शहनाज गिलने बिग बॉस 13 मध्ये खूप चर्चेत राहिली होती. घराबाहेर पडल्यानंतरही अभिनेत्री इंडस्ट्रीत एकामागून एक काम करत आहे. शहनाज गिलचा आगामी चित्रपट ‘थँक्स फॉर कमिंग’ देखील रिलीजपूर्वीच खूप चर्चेत आहे. यापूर्वी शहनाज सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

मोठ्या मनाचा रणबीर, चाहत्यांसोबत वाढदिवस साजरा करत रस्त्यावरच कापला केक
‘चंद्रमुखी २’ला पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर बसला झटका, केली अगदीच कमी कमाई

हे देखील वाचा