Sunday, December 3, 2023

‘चंद्रमुखी २’ला पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर बसला झटका, केली अगदीच कमी कमाई

कंगना रणौतचा (Kangana ranaut) ‘चंद्रमुखी 2’ काल चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. ‘चंद्रमुखी 2’ ला फुक्रे 3 आणि द व्हॅक्सिन वॉरशी टक्कर द्यावी लागली. शाहरुख खानचा ‘जवान’ आणि ‘गदर 2’ चित्रपटगृहांमध्ये आधीच धुमाकूळ घालत आहेत. अशा परिस्थितीत प्रेक्षकांकडे अनेक पर्याय असतात. या सगळ्यामध्ये जर आपण ‘चंद्रमुखी 2’बद्दल पहिले तर राघव लॉरेन्सच्या ‘चंद्रमुखी 2’ ला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट ‘चंद्रमुखी’ या यशस्वी हॉरर-कॉमेडीचा सीक्वल आहे, जो ‘भूल भुलैया’ नावाने हिंदीतही बनला होता. चला जाणून घेऊया ‘चंद्रमुखी 2’ ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी किती कोटींचा गल्ला जमवला आहे?

कंगना राणौत आणि राघव लॉरेन्स यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘चंद्रमुखी 2’ हा चित्रपट अॅक्शन-कॉमेडी, हॉरर आणि रोमान्सचा संपूर्ण पॅकेज आहे. या चित्रपटात कंगना अतिशय सुंदर आणि वेगळ्या अंदाजात दिसली आहे. ‘चंद्रमुखी 2’ चा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला असून चित्रपटातील तिच्या अभिनयाचेही कौतुक झाले आहे. दरम्यान, ‘चंद्रमुखी 2’च्या रिलीजच्या पहिल्या दिवसाचे प्रारंभिक आकडेही आले आहेत.

‘चंद्रमुखी 2’ ने पहिल्या दिवशी चांगले कलेक्शन केले आहे. मात्र, द वॅक्सीन वॉर आणि फुकरे 3 या दोन चित्रपटांमुळे चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झाला आहे. मात्र, वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ होण्याची आशा निर्मात्यांना आहे.

‘चंद्रमुखी 2’ हा 2005 मध्ये रिलीज झालेल्या ‘चंद्रमुखी’चा पुढचा भाग आहे. हा चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘चंद्रमुखी 2’ च्या स्टार कास्टबद्दल बोलायचे झाले तर, कंगना रणौत आणि रघल लॉरेन्स व्यतिरिक्त, वादिवेलू, राधिका सरथकुमार, लक्ष्मी मेनन आणि इतर अनेक कलाकारांनी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे संगीत एमएम कीरावानी यांनी दिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

सोनी सबवरील ‘वागले की दुनिया’ मालिकेतील परिवा प्रणती झाली भावूक; म्हणाली….
‘या’ दिग्दर्शकाच्या अत्याचाराला कंटाळून रणबीर कपूरने सोडला ‘हा’ चित्रपट, खुलासा करत मांडली व्यथा

हे देखील वाचा