Friday, March 29, 2024

‘तू मेरा है और……’, म्हणत शेहनाजने शेअर केले तिच्या आगामी ‘तू यही है’ गाण्याचे पोस्टर

शहनाज गिल सिध्दार्थ शुक्लाच्या निधनानंतर पूर्णतः खचून गेली होती. सिध्दार्थने अचानक या जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण मनोरंजनसृष्टी आणि चाहत्यांमध्ये दुःखद वातावरण निर्माण झाले होते. सिद्धार्थ गेल्यापासून शहनाज सोशल मीडियापासून खूप दूर गेली होती. पण आता ती स्वतःला या सर्वांमधून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच अनेक दिवसांपासून चाहते शहनाजच्या सोशल मीडियावरील पोस्टची आतुरतेने वाट पाहत होते, तर आता त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे.

शहनाजने सिद्धार्थला श्रद्धांजली देत तिच्या गाण्याचे एक पोस्टर इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. यामध्ये तिचा आणि सिध्दार्थचा अगदी आनंदात हसतानाचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो बिग बॉसच्या घरातील असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. या पोस्टरवर ‘तू यही है’ असे लिहिले आहे. यावरुन गाण्याचे बोल हे असल्याचे समजते. तसेच खाली सिध्दार्थसाठी ही श्रद्धांजली असल्याचे देखील तिने लिहिले असून, हे गाणं २९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. शहनाजने हे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तू मेरा है और……’ शेहनाज सिध्दार्थला नेहमी “तू मेरा है और मेरा ही रहेगा”, असे म्हणायची. तोच डायलॉग तिने कॅप्शनमध्ये अर्धवट लिहिला आहे.

तिची ही पोस्ट पाहून अनेक चाहते खुश झाले आहेत पण सिध्दार्थच्या आठवणीने अनेक जण भावुक देखील झाले आहेत. अनेकांनी कमेंटमध्ये रडायचे आणि हार्ट ईमोजी पाठवले आहेत. तसेच शहनाज यामधून सावरत असल्याचे पाहून अनेकांनी तिचे कौतुक देखील केले आहे. एकाने कमेंट करत लिहिले आहे की, “आ गई मेरी शेरणी” तर एकाने “तू एक धीट आणि मजबूत मुलगी आहेस” असे लिहिले आहे. शेहनाजच्या या गाण्याची आता तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

शेहनाज काही दिवसांपूर्वीच तिच्या ‘होसला रख’ या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सिद्धार्थच्या निधनानंतर बऱ्याच दिवसांनी सर्वांसमोर आली होती. या चित्रपटामध्ये दिलजीत आणि सोनम देखील मुख्य भूमिकेत आहेत. शेहनाजच्या अभिनयाविषयी बोलायचे झाल्यास बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याआधी ती काही पंजाबी चित्रपटांमध्ये झळकली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘माझ्यासोबत एका दिग्दर्शकाने सेटवरच केली होती शिवीगाळ’, ईशा गुप्ताचा खुलासा

अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ फोटो पाहिल्यावर तुम्ही देखील नक्कीच म्हणाल, ‘वय हा फक्त आकडा आहे’

‘कोणाचीही मुलगी, बहीण किंवा आई असूदे, मी तिच्याशीच लग्न करणार’, वाचा परेश रावल यांची लव्हस्टोरी

हे देखील वाचा