Friday, July 26, 2024

रियॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून घेतला होता शेखरने भाग, आज सर्वोत्कृष्ट संगीतकारामध्ये केली जाते त्याची गणना

शेखर रवजियानी हे संगीत सृष्टीतील एक मोठे नाव आहे. त्याने आपल्या संगीताने चाहत्यांच्या हृदयात विशेष स्थान मिळवले आहे. सोमवारी (२९ नोव्हेंबर) तो त्याचा ४५वा वाढदिवस साजरा करत आहे. शेखरचा जन्म २९ नोव्हेंबर, १९७८ रोजी गुजरातमधील भुज येथे झाला. शेखर रावजियानी याने नियाज अहमद खास यांच्याकडून संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे. ‘सारेगमपा’ या रियॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून त्याने भाग घेतला होता. त्यानंतर त्याने ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटात आपले पहिले गाणे कंपोज केले होते. शेखरला २००३ मध्ये ‘झंकार बीट्स’ या चित्रपट द्वारे यश मिळाले. ‘झंकार बीट्स’मधील त्याच्या गायकीसाठी त्याला ‘न्यू टॅलेंट हंट आरडी बर्मन’ हा पुरस्कारही मिळाला होता.

‘अशी’ बनली शेखर आणि विशालची जोडी
विशाल दादलानी आणि शेखर रवजियानी यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीला एकापेक्षा जास्त हिट गाणे दिली आहेत. विशाल दादलानीसोबत त्याची जोडी कशी जमली, याबद्दल दिलेल्या मुलाखतीत शेखर म्हणाला होता, “साल १९९७ मध्ये मला ‘प्यार में कभी कभी’या चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. त्या चित्रपटात मी दोन गाणी गात होतो. एके दिवशी मी रेकॉर्डिंग स्टुडिओत जात असताना, तोही त्याच चित्रपटात गात असल्याचे समजले. तेव्हा आम्ही एकत्र काम करायचा निर्णय घेतला. ( shekhar ravjiani birthday special participate in a realty show gave lots of hit music)

 

विशाल दादलानी त्याच्या विचारांबद्दल बराच बोलका आहे, तरी शेखर फारच कमी बोलतो. एका बाजूला विशाल सोशल मीडियावर खुप सक्रिय आहे. तो प्रत्येक नवीन आणि ट्रेंडिंग विषयावर त्यांची मते मांडत असतो. तर दुसरीकडे शेखर सोशल मीडियापासून खूप दूर राहणे पसंत करतो. दोघे वेगळे असूनही संगीताच्या बाबतीत दोघांची निवड सारखीच आहे. आतापर्यंत त्यांची अनेक गाणी प्रसिद्ध झाली आहेत.

 

शेखरचा ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटाने सुरू झालेला प्रवास आतापर्यंत सुरूच आहे. शेखरने विशालसोबत ‘एक अजनबी’, ‘डर्टी पिक्चर’, ‘बँग-बँग’, ‘गिप्पी’, ‘ओम शांती ओम’, ‘हॅपी न्यू इयर’, ‘जिंदा’, ‘रा-वन’, ‘शादी के लड्डू’, ‘शब्द’, ‘सलाम-नमस्ते’, ‘टशन’, ‘तीस मार खान’, ‘हॅट्रिक’, ‘कर्मा’, ‘नॉक आउट’, ‘वी आर फॅमिली’, ‘लंडन ड्रीम्स’, ‘कुर्बान’, ‘कामिनी’, ‘दोस्ताना’, ‘डस’, ‘ब्लफमास्टर’, ‘आय हेट लव्ह स्टोरीज’, ‘झंकार बीट्स’, ‘कांटे’, ‘कहानी’, ‘अनजाना-अंजनी’ या चित्रपटांमध्ये हिट गाणी दिली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती

-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत

-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा

हे देखील वाचा