Friday, July 5, 2024

‘सुपर डान्सर ४’च्या मंचावर शिल्पा शेट्टीचे दणक्यात स्वागत; सगळ्यांचे प्रेम पाहून अभिनेत्रीला अश्रू झाले अनावर

बॉलिवूडमध्ये जेव्हा जेव्हा सुंदर आणि फिट अभिनेत्रींचा विषय निघतो, तेव्हा शिल्पा शेट्टीच्या नावाचा समावेश सर्वात टॉपला असतो. शिल्पा शेट्टी आजही अनेक तरुणींना लाजवेल एवढी फिट आहे. ती टेलिव्हिजनवरील अनेक शोचे परीक्षण करताना दिसते. मागील काही दिवसांपासून ती डान्सिंग रियॅलिटी शो ‘सुपर डान्सर ४’ चे परीक्षण करत होती. परंतु १९ जुलैला जेव्हा तिचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपटाच्या निर्मितीसाठी अटक करण्यात आले, तेव्हापासून शिल्पा या शोमध्ये दिसली नव्हती. परंतु आता शिल्पा पुन्हा एकदा शोमध्ये परत आली आहे आणि ती सगळ्या स्पर्धकांचे मनोबल वाढवताना दिसत आहे. पण यामध्ये एक क्षण असा आला, जेव्हा शिल्पा तिच्या भावनांना आवर घालू शकली नाही.

माध्यमातील वृत्तानुसार, शिल्पा शेट्टी जेव्हा ‘सुपर डान्सर’च्या सेटवर पोहचली तेव्हा सगळे स्पर्धक खूप खुश झाले आणि त्यांनी शिल्पाभोवती घोळका घातला. सगळ्यांचे प्रेम पाहून शिल्पाला मात्र तिचे अश्रू अनावर झाले. तिला रडताना पाहून सगळ्यांनी तिला मिठी मारली. हाती आलेल्या माहितीनुसार, सुपर डान्सरची टीम शिल्पाला परत शोमध्ये आणण्यासाठी खूप प्रयत्न करत होती. शोचे निर्माते देखील तिला बोलवत होते. शेवटी तिने या शोमध्ये येण्याची मनाची पूर्ण तयारी केली. आणि तिचे सेटवर जोरदार स्वागत झाले आहे. (Shilpa Shetty breaks down in tears after receiving grand welcome on the super dancer 4 set)

अनुराग बासू आणि गीता कपूर यांनी देखील तिचे मनोबल वाढवले. अनुराग बासूने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, “आम्ही एखाद्या कुटुंबाप्रमाणे आहोत. यात एखादा जरी सदस्य नसेल, तर सगळं कठीण होऊन जातं आणि शिल्पा तर आम्हा सगळ्यांना खूप आवडते.” तर शिल्पा सेटवर काही प्रमाणात नाराजही दिसत होती.

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट बनवून ते ऑनलाईन ऍपद्वारे दाखवल्या प्रकरणी १९ जुलैला अटक केली होते. त्यानंतर शिल्पावर देखील अनेक प्रश्नचिन्ह उभी राहिली होते. या दरम्यान ती आणि तिचे कुटुंब अनेक वाईट प्रसंगातून गेले आहे. यातून बाहेर येऊन आता शिल्पाने पुन्हा एका सुपर डान्सरमध्ये आगमन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लईच भारी! उर्मिला कोठारेनं सुंदर फोटो केले शेअर; दिसतेय एकदम बिनधास्त

-सारा- इब्राहिमपासून ते रणबीर- रिद्धिमापर्यंत ‘या’ बहीण- भावांच्या जोड्या आहेत खूपच प्रसिद्ध; एकमेकांवर ओवाळून टाकतात जीव

-लहानपणापासूनच होती अभिनयाची आवड; ‘तेरे नाम’नंतर उंचावला भूमिकाचा चित्रपटातील आलेख, आज आहे खूपच ग्लॅमरस

हे देखील वाचा