क्राईम ब्रांचकडून करण्यात आली शिल्पाची चौकशी; ‘पॉर्न रॅकेटबाबत माहिती होते का?’ सह विचारले ‘हे’ प्रश्न


राज कुंद्रा अश्लील चित्रपट प्रकरणात बरेच खुलासे झाले आहेत. राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. शुक्रवारी त्याला २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्राच्याविरोध अश्लील चित्रपट बनवणे, ते विकणे, स्ट्रीमिंग अ‍ॅप्सवर वेबसाईट्सवर अपलोड करणे याचे पुष्कळ पुरावे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान राज कुंद्राची आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीची चौकशी करण्यात आली. शुक्रवारी कोर्टाने राज कुंद्राला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर, पोलीस राज कुंद्राला त्याच्या राहत्या घरी घेऊन गेले. तिथे अभिनेत्री शिल्पा आणि राज यांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी केली गेली. तब्बल सहा तास ही चौकशी सुरु होती. शिल्पाला विचारलेल्या जवळपास सर्वच प्रश्नांची उत्तरं तिने नकारार्थीच दिली आहेत. या चौकशीच्या वेळी शिल्पाला विचारलेल्या प्रश्नांची यादी समोर आली आहे. पाहूया हे प्रश्न कोणते आहेत. (shilpa shetty interrogated by crime branch team)

photocourtesy: instagram; theshilpashetty

१) वियान कंपनीमधून २०२० साली तुम्ही बाहेर का पडलात? तुमचे तर खूप चांगले शेअर्स त्यात होते?

२) तुम्हाला वियान आणि कॅमरिन या दोन्ही कंपन्यांमध्ये होणाऱ्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती होती का?

३) पॉर्न व्हिडीओ लंडनमध्ये पाठवण्यासाठी किंवा अपलोड करण्यासाठी बऱ्याचदा वियान कंपनीच्या कार्यालयाचा वापर करण्यात आला, याची तुम्हाला माहिती होती का?

४) तुम्हाला हॉटशॉटबाबत काही माहीत होते, कोण चालवायचे ते?

५) हॉटशॉटच्या व्हिडीओ कंटेंटबद्दल तुम्हाला काय माहिती आहे?

६) तुम्ही कधी हॉटशॉटच्या कामात सहभागी झाल्या आहेत का?

७) कधी प्रदीप बक्षी (राज कुंद्राचा मेव्हणा) यांच्याशी हॉटशॉटबाबत बोलणे झाले होते का?

८) पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या मोबाईलमधील चॅट आणि मेसेज दाखवून शिल्पाकडे चौकशी केली गेली.

९) तुम्हाला राज कुंद्रा करत असलेल्या सर्व कामांबाबत माहिती होती का?

१०) राज कुंद्राच्या आर्थिक व्यवहारांबाबत तुम्हाला काय काय माहिती आहे?

Photo Courtesy: Instagram/rajkundra9

प्राप्त माहितीनुसार शिल्पाने पोलिसांना सांगितले, राज ऍप्पसाठी व्हिडिओ बनवायचा. मात्र ते पॉर्न व्हिडिओ नाही, इरॉटिक व्हिडिओ होते. इरॉटिक हे पॉर्नपेक्षा वेगळे आहे आणि तिचा नवरा निर्दोष आहे. राज कुंद्राचा बिझनेस पार्टनर आणि त्याचा मेहुणा असलेल्या प्रदीप बक्षीने राजच्या नावाचा गैरवापर केला असे तिचे म्हणणे आहे.

दरम्यान मुंबई पोलिसांनी राजच्या जुहू येथील घरावर छापेमारी देखील केली. यात त्यांना काही हार्ड डिस्क, शिल्पाचा लॅपटॉप, आयपॅड आणि काही कागदपत्रे मिळाली असून, त्यांना जप्त करण्यात आले आहेत. माहितीनुसार, मुंबई पोलिस शिल्पाच्या फोनची क्लोनिंग करणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

खरंच की काय! रिया चक्रवर्तीला बॉलिवूड नाही, तर हॉलिवूडमधून मिळणार चित्रपटांमध्ये झळकण्याची संधी?

-सुहानाने स्विमिंग पूल जवळील हॉट फोटो केले शेअर; आई गौरीने केले क्लीक, तर शाहरुख म्हणतोय, ‘हा दिखावा आहे…’

मीरा राजपूतने केली ओठांची सर्जरी? व्हि़डिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण


Leave A Reply

Your email address will not be published.