×

कुटुंबातील ‘या’ सदस्याच्या जाण्याने दु:खी झालीय शिल्पा शेट्टी, शेअर केली भावनिक पोस्ट

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. आपल्या चाहत्यांशी ती आपले फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. नेहमीच आपल्या पोस्टने चाहत्यांना आनंद देणार्‍या शिल्पाने नुकताच तिच्या घरातील एक सदस्याचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली आहे. यावेळी शिल्पाने व्यक्त केलेल्या भावनांनी तिच्या चाहत्यांना सुद्धा दुःख झाले आहे. कोण आहे तो शिल्पाच्या घरातील सदस्य चला जाणून घेऊ.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या खूपच दुःखी आहे. तिच्या घरातील एक सदस्य कायमचा सोडून गेल्याने ती खूपच दुखावली आहे. फक्त शिल्पा शेट्टीच नव्हे, तर तिच्या घरातील प्रत्येक व्यक्ति या प्रेमळ सदस्याच्या मृत्यूने दुखावला आहे. याबाबतची पोस्ट शिल्पा शेट्टीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केली आहे. यामध्ये तिने घरातील या सदस्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिची ही पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

शिल्पा शेट्टीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत शिल्पाने व्यक्त केलेल्या भावना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणतील अशाच आहेत. हा व्हिडिओ आहे शिल्पाच्या घरातील डॉगीचा. शिल्पाच्या घरातील सदस्य असलेल्या या डॉगीचे नाव दुःखद निधन झाले आहे. त्याचाच एक सुंदर व्हिडिओ शिल्पाने शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत शिल्पाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

View this post on Instagram

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

यामध्ये ती म्हणते की, “माझे पहिले बाळ, माझी प्रिंन्सेस कुंद्रा शेट्टी. आमच्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. १२ वर्ष तु दिलेल्या अनमोल आठवणीसाठीसुद्धा खूप खूप धन्यवाद. तू तुझ्यासोबत आमच्या हृदयाचा तुकडा घेऊन गेली आहेस. घरातील प्रत्येकाला तुझा लळा लागला होता. आई बाबा, राज आम्हा सगळ्यांना तुझी खूप आठवण येईल. भावपूर्ण श्रद्धांजली.” शिल्पा शेट्टीची ही भावनिक पोस्ट पाहून तिचे चाहतेसुद्धा दुःखी झाले आहेत. चाहते शिल्पाला काळजी घेण्याचे आवाहनसुद्धा करत आहेत.

हेही वाचा

हेही पाहा-

Latest Post