बॉलिवूडमधील फिटनेस क्वीन म्हटले की, सर्वात आधी शिल्पा शेट्टीचेच नाव सर्वांच्या लक्षात येईल. चाळीशी पार करूनही शिल्पा २५ वर्षांचीच तरुणी वाटते. सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ती ओळखली जाते. आपले फोटो, व्हिडिओ, स्टोरी, मतं नेहमीच ती अपडेट करत असते. सोबतच ती तिच्या या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत देखील असते.
शिल्पाने नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात ती स्लीव्हलेस पांढऱ्या रंगाचा टॉप आणि डेनिममध्ये कमाल दिसत आहे. तिचे मोकळे केस तिचा हा लूक अधिक खुलवत आहे. शिल्पाचा हा फोटो तिच्या इतर फोटोसारखाच मोठ्या प्रमाणावर इंटरनेटवर व्हायरल होत असून, फॅन्स आणि कलाकार तिला कॉम्प्लिमेंट देताना दिसत आहेत.
शिल्पाचा हा लूक तिच्या आगामी ‘हंगामा २’ च्या प्रमोशनवेळीचा असून, ती सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचे अजून एक वैशिट्य म्हणजे या सिनेमात शिल्पाचे सुपरहिट गाणे ‘चुरा के दिल मेरा’ हे एका वेगळ्या रूपात आणि ढंगात दिसणार आहे.
शिल्पाचा हा सिनेमा तिच्यासोबतच तिच्या फॅन्ससाठी खूपच खास असणार आहे, कारण या चित्रपटाच्या निमित्ताने ती बऱ्याच वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबतच परेश रावल, राजपाल यादव, मीझान जाफरी, प्रणिता हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले आहे.
येत्या २३ जुलै रोजी डिझनी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हंगामा 2 प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शिल्पा शेट्टी जवळपास १३ वर्षांनी कमबॅक करणार आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अपने’ या चित्रपटात शिल्पा शेवटची दिसली होती. लवकरच तिचा ‘निकम्मा’ हा सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे.
सध्या शिल्पा शेट्टी टेलिव्हिजन इंडस्ट्री गाजवताना दिसत आहे. ती टीव्हीवरील सुपर डान्सर या रियॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका बाजवत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…