‘फिटनेस’ हा शब्द ऐकला तरी सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच नाव येते, ते म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी. वयाच्या 45 व्या वर्षी देखील ती आपल्या फिटनेसने भल्या भल्या अभिनेत्रींना समोर टक्कर देते. तिच्या अभिनयासोबत तिच्या डान्सने देखील चित्रपटसृष्टीमध्ये तिने एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. शिल्पा शेट्टी ही लवकरच तिचा विनोदी चित्रपट ‘हंगामा 2’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शिल्पा, परेश रावल, राजपाल यादव आणि अन्य कलाकारांची कॉमेडी दिसणार आहे. या चित्रपटात शिल्पाचे प्रसिद्ध गाणे ‘चुरा के दिल मेरा’ या गाण्याचा रिमेक केला आहे. ज्याचा टिझर समोर आला आहे. हा टिझर शिल्पाने काही वेळापूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. (Shilpa Shetty share her chura ke dil mera song’s remake varsion’s teaser on social media)
शिल्पा शेट्टी या गाण्याच्या रिमेक वर्जनमध्ये अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे. आधीच्या गाण्यात शिल्पा जेवढी सुंदर दिसत होती, त्यापेक्षाही जास्त सुंदर ती या गाण्यात दिसत आहे. तिला या ग्लॅमरस अंदाजात पाहून तिचे चाहते खूप खुश झाले आहेत. तिचा हा अंदाज पाहून कोणीही तिचे कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही.
हा टिझर शेअर करून तिने लिहिले आहे की, “खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेवटी मी आलोच. तुमच्यासाठी ‘चुरा के दिल मेरा 2.0’ चा टिझर. पूर्ण गाणे उद्या सकाळी 11:11 मिनिटांनी प्रदर्शित केले जाईल.” या टिझरला 2 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
आपण ‘हंगामा 2’ च्या ट्रेलरमध्ये पाहू शकतो की, शिल्पा शेट्टी बाकी कलाकारांना हसवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रियदर्शन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या आधी त्यांनी ‘हंगामा’, ‘हेराफेरी’, ‘हलचल’, ‘भूल भुलैया’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…