Tuesday, September 17, 2024
Home बॉलीवूड प्रेग्नेंसी काळात बॉडी शेमिंगची शिकार झालेली शिल्पा शेट्टी; म्हणाली, ‘मी ग्लॅमरच्या दुनियेत काम करते…’

प्रेग्नेंसी काळात बॉडी शेमिंगची शिकार झालेली शिल्पा शेट्टी; म्हणाली, ‘मी ग्लॅमरच्या दुनियेत काम करते…’

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty) नेहमीच तिच्या टोन्ड बॉडी आणि फिटनेससाठी ओळखली जाते. पण एक वेळ अशी होती जेव्हा अभिनेत्रीला तिच्या वजनामुळे सोशल मीडियावर खूप ट्रोल व्हावे लागले होते. बॉडी शेमिंगचा बळी ठरलेल्या शिल्पाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तिचा मुलगा विआनच्या जन्मानंतर तिला तिच्या वजनामुळे जगभरातील लोकांच्या टोमण्यांचा सामना करावा लागला होता.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत शिल्पा शेट्टीने बॉडी शेमिंगवर मोकळेपणाने बोलले. तिने सांगितले की, तिच्या लूक आणि वजनासाठी तिला खूप ट्रोल केले गेले असले तरीही तिने या सर्व गोष्टींचा तिच्यावर फारसा परिणाम होऊ दिला नाही. संभाषणादरम्यान ती म्हणते, “मी ग्लॅमरच्या जगात काम करते आणि ग्लॅमरस दिसणे हे माझे काम आहे”.

ती पुढे सांगते, “मुलाच्या जन्मानंतर 8 महिने माझे वजन कसे कमी झाले नाही हे लोकांना समजले नाही. पण मला वजन कमी करायचे नाही हे त्या लोकांना समजू शकले नाही. तसेच या सर्व गोष्टींकडे मी फारसे लक्ष दिले नाही. ज्या दिवशी मी ठरवले की मला वजन कमी करायचे आहे, मी 3 महिन्यांत वजन कमी केले. लोकांचा विचार करण्याची पद्धत तुम्ही बदलू शकत नाही, त्यामुळे मी त्यांना फारसे गांभीर्याने घेत नाही.

अभिनेत्रीला विश्वास आहे की, लोकांच्या सकारात्मक प्रतिक्रियांमुळे तिला वजन कमी करण्यात खूप मदत झाली. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, शिल्पा शेट्टी शेवटची ‘निकम्मा’ चित्रपटात दिसली होती. आता लवकरच ही अभिनेत्री ‘सुखी’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 22 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

यासोबतच ही अभिनेत्री लवकरच ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या मालिकेत ती दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

आईच्या हट्टाने सनाया ईरानी झाली अभिनेत्री, पुढे मोहित सेहगलसोबत थाटला संसार
मालिकेत काम करून निया शर्माने कमावले नाव, हॉटनेसबाबत बॉलिवूड अभिनेत्रींना देखील टाकले मागे

हे देखील वाचा