शिल्पाने धुडकावून लावली होती १० कोटी रुपयांची जाहिरात, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक


कलाकारांसाठी चित्रपटांव्यतिरिक्त मोठ्या कमाईचे साधन म्हणजे मोठ- मोठ्या एंडोर्समेंट होय. कलाकार त्यांच्या चित्रपटांसोबतच वेगवेगळ्या ब्रँड्सच्या जाहिराती करतात. त्याकरून त्यांना कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. सेलिब्रिटी त्यांच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये अधिक भर पाडण्यासाठी सोबतच भरपूर पैसा कमावण्यासाठी मोठ्या ब्रँड्ससोबत काम करतात. अनेक मोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये बरेच मोठे कलाकार आपण पाहिले असतील. कलाकार नेहमीच विविध ब्रँड एंडोर्समेंट करण्यासाठी तयार असतात. मात्र, या एंडोर्समेंटला अनेक कलाकार अपवाद देखील ठरतात.

याच अपवाद असणाऱ्या कलाकारांमध्ये शिल्पा शेट्टीचे देखील नाव जोडले गेले आहे. आपल्या फिटनेसबाबत कोणतीही तडझोड न करणारी शिल्पा शेट्टी वयाच्या ४६ व्या वर्षी देखील कमालीची फिट आहे. तिच्याकडे पाहून कोणीच तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही. दररोजचा व्यायाम, योग्य डाएट यांमुळेच तिने तिचा फिटनेस मिळवला आहे. शिल्पा नुकतीच तिच्या एका निर्णयामुळे मीडियामध्ये कमालीची चर्चेत आली आहे.

शिल्पाला स्लिमिंग पिल्सच्या एका ब्रँडने एंडोर्समेंटसाठी विचारणा करत तिला १० कोटी रुपयांची ऑफर दिली होती. मात्र, शिल्पाने क्षणाचाही विलंब न लावता या ऑफेरला नकार दिला आहे. शिल्पा अनेक मोठमोठ्या ब्रँड्सच्या जाहिराती करताना आपल्याला दिसते. मात्र, या एवढ्या मोठ्या जाहिरातीला नकार दिल्यामुळे शिल्पाच्या या निर्णयावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

या जाहिरातीला नकार देताना शिल्पाने सांगितले की, “जेव्हा आपण दुसऱ्याला एखादा उपदेश देतो, तेव्हा आपणही त्यावर चालणे आवश्यक आहे. मी अशा गोष्टी नाही विकू शकत, ज्यावर माझा स्वतःचा विश्वास नसेल. स्लिमिंग पिल्स भलेही लवकर रिजल्ट देण्यासाठी लोकांना स्वतःकडे आकर्षित करत असतील. मात्र, सत्य तर हेच आहे की, योग्य व्यायाम, योग्य आहार आणि शिस्तबद्ध जीवनशैली यापेक्षा मोठे काहीच नाही. जगात कोणत्याही गोष्टीसाठी शॉर्टकट नाहीये. वजन कमी करण्यासाठी देखील योग्य जीवनशैली आपण अंगिकारलीच पाहिजे.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बापरे! एका वर्षात प्रभासने नाकारल्या होत्या, एक- दोन नाही, तर तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांच्या जाहिराती

-‘…नैणा ठग लेंगे’, म्हणत प्रार्थना बेहेरेच्या नजरेने केला चाहत्यांच्या हृदयावर वार; ग्लॅमरस फोटो होतायेत व्हायरल

-नववारी साडीमध्ये खुललं अपूर्वा नेमळेकरचं सौंदर्य; तर कॅप्शननेही वेधलं अनेकांचं लक्ष


Leave A Reply

Your email address will not be published.