फिटनेस हा शब्द ऐकला तरी सगळ्यांच्या डोळ्यासमोर येते ते एकच नाव. ते म्हणजे बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री शिल्पा शेट्टी. वयाच्या 45 व्या वर्षी देखील एवढा फिटनेस बघून भल्या भल्या अभिनेत्री तिच्या समोर गार होतात. तिच्या अभिनयासोबत तिच्या डान्सने देखील चित्रपटसृष्टीमध्ये तिने एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. तसेच तिचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या आयुष्यातील अनेक घटना ती तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.
शिल्पा शेट्टीचे फिटनेसच्या व्हिडिओला देखील मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असते. शिल्पा शेट्टीचे इंस्टाग्रामवर 20 मिलियन म्हणजे 2 कोटी एवढे फॉलोवर्स झाले आहेत. तिने हा आनंद साजरा करताना एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या आयुष्यातील 20 वेगवेगळ्या महत्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे.
इंस्टाग्रामवर 20 मिलियन फॉलोवर्स झाल्याने शिल्पाने व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की,” 20 मिलियन तुम्ही सगळ्यांनी मला खूप प्रेम आणि सपोर्ट केला. या गोष्टी सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत. एवढी सुंदर इंस्टा फॅमिली बनवल्याबद्दल धन्यवाद. मी फक्त तुमच्यामुळे इथे पोहचली आहे. तुम्हा सगळ्यांना खूप प्रेम.”
शिल्पा शेट्टीने 1993 मध्ये ‘बाजीगर’ या चित्रपटातून स्क्रीन पदार्पण केले होते. ती लवकरच बॉलिवूडमधील अनेक चित्रपटात दिसणार आहे. ती ‘निकम्मा’ आणि ‘हंगामा -2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिल्पा शेट्टी खूप कालावधीनंतर सिल्व्हर स्क्रीनवर पुन्हा एकदा पदार्पण करणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-खेसारी लालचं नवीन गाणं रिलीझ, पंजाबी गायकांनाही देतोय टक्कर; चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद
-सुपरस्टार अरविंद आणि काजल पहिल्यांदाच दिसले रोमान्स करताना, व्हिडिओ पाहून प्रेक्षक भलतेच खुश