येणाऱ्या प्रत्येक दिवसाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे महत्त्व प्राप्त झालेले असते. आजच्या दिवसाचे महत्त्व किंवा सोप्या भाषेत सांगायचे तर दिनविशेष कोणते हे आपल्याला गुगलमुळे समजण्यास खूप सोपे जाते. शिवाय वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या यादेखील त्या- त्या दिवसाचे महत्त्व आपल्याला सांगतात. इतिहासात त्या दिवशी काय घडले आहे याला आपण दिनविशेष म्हणतो. एखाद्या महत्त्वाच्या दिवशी दिग्गज आणि कर्तृत्वान व्यक्तीला आणि त्याच्या कार्याला सलाम करण्यासाठी गुगल त्यांच्या त्या दिवसाच्या लोगोमध्ये बदल करत, विशिष्ट व्यक्तीचे फोटो टाकत लोगो तयार करते. याला गुगलचे डुडल म्हणतात.
गुगलचे लोगो पाहिल्यावर आपल्याला अनेक महान व्यक्ती आणि त्यांचे असामान्य कर्तृत्व समजते. आज ९ जून च्या दिवशी देखील गुगलने अशाच एका महान स्त्रीचे डुडल बनवून सन्मानित करत आदरांजली वाहिली आहे. गुगलने आज अमेरिकी अभिनेत्री, गायक, डान्सर, शर्ली टेम्पलचे ऍनिमेटेड डुडल साकारून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
दिनांक २३ एप्रिल, १९२८ ला अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका शर्ली यांचा कॅलिफोर्नियामध्ये जन्म झाला. त्या खूपच सुंदर होत्या. कुरळे केस, गालावर पडणारी खळी, गोरापान रांग, सुंदर डोळे यांमुळे त्यांना बघणाऱ्या व्यक्ती त्यांच्याकडे पाहतच राहायच्या. शर्ली या त्यांच्या आई- वडिलांचे तिसरे अपत्य होत्या. शर्ली यांच्या आईंना डान्सर व्हायचे होते. मात्र, त्यांची उंची खूप असल्याने त्यांना त्यांचा डान्सचा छंद अपूर्ण सोडावा लागला. त्यांच्या आईने शर्लीमध्ये आपले बालपण बघत त्यांना वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच डान्स शिकवायला सुरुवात केली. डान्स शिकत असताना एज्युकेशनल पिक्चर्सच्या दिग्दर्शकांची नजर शर्ली यांच्यावर पडली आणि त्यांनी शर्ली याना ऑडिशनसाठी स्टुडिओमध्ये बोलावले.
Google today shared a doodle celebrating American actor, singer, dancer, and diplomat Shirley “Little Miss Miracle" Temple. The animated doodle features her in three different stages of her life.#GoogleDoodle #ShirleyTemple pic.twitter.com/xIW5KHwyb3
— Megha Kejriwal (@Megha_journo) June 9, 2021
शर्ली यांनी ‘पावर्टी रो’ सिनेमातून अभिनयात पदार्पण केले. मात्र, त्यांना खरी ओळख मिळाली ती १९३४ साली आलेल्या ‘ब्राइट आईज’ या सिनेमामुळे. ‘आन द गुटशिप लॉलीपॉप’ या सिनेमातील शर्ली यांचा आवाज आणि त्यांचा सुंदर चेहरा यांमुळे त्यांना संपूर्ण जगात ओळख मिळाली. अभिनयाच्या क्षेत्रात केवळ दोनच वर्षात त्यांनी अमाप लोकप्रियता मिळवली. शर्ली या हॉलिवूडमधील पहिल्या बालकलाकार होत्या.
शर्ली यांना वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षी अकादमी अवॉर्ड मिळाला होता. १९३४ ते १९५० या काळात त्यांनी जवळपास ४३ चित्रपटांमध्ये काम केले. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी अभिनयातून निवृत्ती घेतली. त्यानंतर उरलेल्या आयुष्य त्यांनी जनतेच्या सेवेसाठी खर्ची घातले. त्यांना खूपच कमी वयात प्रचंड प्रसिद्धी मिळाली.
सन १९६९ साली शर्ली यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांना संयुक्त राष्ट्रात अमेरिकेचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांना घाना येथे राजदूत आणि विदेश विभागात प्रोटोकोलची पहिली महिला प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. १९८८ साली त्यांना मानद विदेश सेवा अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
आजच्याच दिवशी म्हणजे ९ जून, २०१५ ला याच दिवशी सांता मोनिका हिस्ट्री म्यूझियमने शर्ली टेम्पल यांच्या Love, Shirley Temple ची सुरुवात केली आहे. या म्यूझियममध्ये त्यांच्या काही आठवणींतील वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. १० फेब्रुवारी, २०१४ रोजी शर्ली टेम्पल यांनी कॅलिफोर्नियामध्ये अखेरचा श्वास घेतला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-