चित्रपटात येण्यापूर्वी वेट्रेस होती ‘फॅशन दिवा’ सोनम; अभिनय नव्हे, तर ‘या क्षेत्रात करायची होती तिला कारकीर्द

sonam kapoor birthday special here are untold facts about delhi 6 actress


चित्रपटसृष्टीतील मोठ्या कुटुंबात जन्म घेतल्यानंतरही असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी चित्रपटांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी वेगवेगळी कामे केली आहेत. त्या कलाकारांपैकीच एक आहे ‘नीरजा’ अर्थातच अभिनेत्री सोनम कपूर. सोनम बॉलिवूडच्या कपूर कुटुंबातील आहे, ती सदाबहार अभिनेता अनिल कपूरची मुलगी आणि अर्जुन कपूरची चुलत बहीण आहे. स्वत: सोनम कपूर देखील एक यशस्वी अभिनेत्री आहे. सोनम कपूर दरवर्षी ९ जूनला तिचा वाढदिवस साजरा करते, तसेच ती यावर्षी ३६ वर्षांची होईल. पण तुम्हाला माहिती आहे का? की चित्रपटात प्रवेश करण्यापूर्वी सोनम कपूरनेही काम केले आहे, मात्र एखाद्या मोठ्या कंपनीत नव्हे, तर वेट्रेस म्हणून केले आहे. सोनम कपूरच्या चित्रपट कारकीर्दीबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे. पण आज आम्ही तुम्हाला तिच्या वाढदिवशी तिच्या आयुष्याशी संबंधित काही मनोरंजक किस्से सांगणार आहोत.

चित्रपटात येण्यापूर्वी वेट्रेस होती सोनम
सोनम कपूर अभिनेता अनिल कपूरची मुलगी आहे. मनोरंजन विश्वात अनिल कपूर सर्वात तंदुरुस्त आणि तरुण अभिनेता असल्याचे म्हटले जाते. अशा परिस्थितीत सोनमला वेट्रेसचे काम का करावे लागले, हा प्रश्न बर्‍याच जणांच्या मनात निर्माण झाला असावा. खरं तर सोनमने हे काम कोणत्याही सक्तीमुळे केले नसून, पॉकेट मनी वाढवण्यासाठी आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी केले होते. सोनम १५ वर्षांची असताना, तिने एका रेस्ट्राॅरंटमध्ये काम करण्यास सुरवात केली. जिथे ती वेटर म्हणून काम करायची. पण तिने १ आठवड्यानंतर ही नोकरी सोडली होती.

तिची खिल्ली उडवल्यामुळे बॉयफ्रेंडशी केला होता ब्रेकअप
सोनम कपूर चित्रपट जगातील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला फिल्मी जगाची ‘फॅशनिस्टा’ देखील म्हटले जाते. पण एक काळ असा होता, जेव्हा सोनम खूप लठ्ठ होती. कॉलेजच्या काळात तिच्या लठ्ठपणाबद्दल अनेकदा तिची चेष्टा केली जायची. याचा खुलासा स्वतः सोनमने केला होता. सोनम वयाच्या १५ ते २० व्या वर्षादरम्यान पीसीओसी या आजाराशी झुंज देत होती, ज्यामुळे तिचे वजन वेगाने वाढत होते. वजन वाढत असल्यामुळे सोनमने तिच्या बॉयफ्रेंडला सोडले होते. खरं तर बॉयफ्रेंडने तिच्या लठ्ठपणाबद्दल अपशब्द वापरले होते, त्यानंतर सोनमने त्याच्यासोबत सगळे संबंध तोडले.

सोनममुळे अर्जुन कपूरने खाल्ला होता जब्बर मार
सोनम कपूर आणि अर्जुन कपूर हे चुलत भाऊ-बहीण आहेत. अर्जुन हा बोनी कपूरचा मुलगा आहे आणि तो सोनम कपूरच्या अगदी जवळ आहे. दोघांनीही एकाच शाळेत शिक्षण घेतले आहे. जेव्हा शाळेत सोनम कपूरचे कोणाशी भांडण व्हायचे, तेव्हा ती आपला भाऊ अर्जुनला घेऊन भांडण करण्यासाठी जात असे. अर्जुनने एकदा संभाषणादरम्यान सांगितले होते, की सोनममुळे त्याने शाळेतील एका सिनिअरचा खूप मार खाल्ला होता. खरंतर शाळेत एका सिनिअरने सोनमकडून बॉल हिसकावून घेतला आणि सोनम रडत भाऊ अर्जुनकडे गेली. सोनमच्या डोळ्यातले अश्रू पाहून अर्जुन मुलाशी भांडायला गेला. अर्जुनने सांगितले की, सोनममुळे त्याने त्यावेळी जब्बर मार खाल्ला होता, कारण तो सिनिअर बॉक्सिंग चॅम्पियन होता.

सोनमला अभिनेत्री नव्हते व्हायचे
सोनमने २००७ साली संजय लीला भन्साळीच्या ‘सावरिया’ या चित्रपटाद्वारे कारकिर्दीची सुरुवात केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता. सोनम कपूरचे नाव आज बॉलिवूडमधील ए-लिस्टर अभिनेत्रींमध्ये गणले जाते. मात्र क्वचितच लोकांना हे माहित असेल की, सोनम कपूरला कधीच अभिनेत्री व्हायचे नव्हते. वास्तविक सोनम कपूरला लेखक आणि दिग्दर्शक व्हायचे होते. ज्यामुळे तिने मुंबईला येऊन संजय लीला भन्साळीसह सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरवात केली. २००५ मध्ये सोनमने राणी मुखर्जीच्या ‘ब्लॅक’ चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. सोनम लेखक होण्याचे स्वप्न घेऊन आली होती, पण संजय लीला भन्साळीला तिला अभिनेत्री बनवायचे होते. सोनमचा ‘सावरिया’ साठी होकार मिळवण्यासाठी दीड वर्ष लागले होते.

आतापर्यंत एकूण ६ चित्रपट ठरलेत हिट
सोनम कपूरने आतापर्यंत तिच्या कारकीर्दीत सुमारे २३ चित्रपट केले असून, त्यापैकी ११ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले आहेत. परंतु असे असूनही, तिने तिच्या चित्रपट प्रवासात ६ सर्वोत्कृष्ट चित्रपट दिले आहेत, ज्याने तिचा बॉलिवूडच्या सुपरहिट अभिनेत्रीच्या यादीत समावेश केला. तिच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये ‘नीरजा’, ‘रांझणा’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘प्रेम रतन धन पायो’ आणि ‘पॅडमॅन’ यांचा समावेश आहे. ‘नीरजा’ हा सोनम कपूरच्या कारकिर्दीतील आत्तापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो. या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. याशिवाय सोनम कपूरने व्यावसायिक आनंद आहूजाशी लग्न केले आहे आणि बहुतेक वेळा ती आपल्या पतीसमवेत भारत आणि लंडनमध्ये प्रवास करताना दिसते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वेगळे राहूनही डिंपल यांनी घेतला नव्हता राजेश खन्नांपासून घटस्फोट; सनी देओलसोबत देखील जोडले होते त्यांचे नाव

-अक्षय कुमारच्या प्रेमात बुडाली होती शिल्पा शेट्टी; धोका मिळाल्यानंतर थाटला आधीच विवाहित असलेल्या राज कुंद्राशी संसार


Leave A Reply

Your email address will not be published.