Friday, June 14, 2024

शिव ठाकरे मोठ्या अभिनेत्यासोबत झळकणार सिनेमात, स्वतःच केला इंस्टाग्राम लाइव्हमधून खुलासा

काही दिवसांपूर्वीच हिंदी बिग बॉसचे १६ वे पर्व संपले. रॅपर एमसी स्टॅनने बाजी मारत विजेत्याची ट्रॉफी नावावर केली. बिग बॉसच्या एवढ्या पर्वांमधे हे पर्व चांगलेच गाजले. त्यामुळेच पर्वाला चार आठवड्यांची मुदत देखील वाढवून मिळाली होती. या पर्वामध्ये शिव ठाकरे जिंकेल असा विश्वास सर्वांनाच होता मात्र शेवटच्या क्षणी ते स्वप्न तुटले आणि शिव पहिला रनरअप ठरला. असे असूनही शिवाची लोकप्रियता अधिकच वाढत आहे. बिग बॉस झाल्यानंतर पहिल्यांदाच शिव इंस्टाग्राम लाइव्ह करत त्याच्या फॅन्सच्या संपर्कात आला. त्याने यावेळी अनेक गोष्टीवर गप्पा मारल्या. बिग बॉसच्या घरातील अनेक किस्से सांगितले. सोबतच त्याच्या आगामी प्रोजेक्टवर देखील भाष्य केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

शिवने बिग बॉसच्या घरात राहून अनेक बड्या लोकांसोबतच संपूर्ण देशातील जनतेची मनं जिंकली आहे. बिग बॉसमध्ये जरी त्याला उपविजेत्यापदावर समाधान मानावे लागले असले तरी लवकरच तो नवीन प्रोजेक्टमध्ये दिसावा अशी त्याचे फॅन्स अपेक्षा करत आहे. शिव ठाकरे लवकरच रोहित शेट्टीच्या ‘खतरो के खिलाडी’ शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय शिवने इंस्टाग्राम लाइव्हवर आल्यावर बोलताना तो लवकरच एका मोठ्या चित्रपटात काम करणार असल्याचे जाहीर केले.

याबद्दल त्याने अधिक काहीच सांगितले नसले तरी या मोठ्या चित्रपटात शिव ठाकरे एका मोठ्या कलाकारांसोबत झळकणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्याकडून ही माहिती आल्यानंतर आता त्याचे फॅन्स चांगलेच उत्सुक झाले आहे. लवकरच शिव याबद्दल अधिकृत माहिती देणार असल्याचे त्याने स्पष्ट केले असून, नक्की शिव कोणत्या कलाकारांसोबत झळकणार याचा आता त्याचे फॅन्स अंदाज बांधत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पैसे कमावण्यासाठी विकायचे चहा, पहिल्या पत्नीसोबत केले होते दुसऱ्यांदा लग्न; वाचा ‘अन्नू कपूर’ यांचा संघर्षमय प्रवास

हंसिका मोटवानी ओटीटीवर तिचे लग्न दाखवण्यासाठी सज्ज, वेब सिरीजचा दमदार ट्रेलर रिलीज

हे देखील वाचा